LIVE BLOG | गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाजूला बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल
LIVE
Background
1. विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानचा सलग सातव्यांदा पराभव, मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचा 89 धावांनी विजय, रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच
2. राज्यमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची धुरा, अनिल बोंडेंच्या खांद्यावर कृषी मंत्रालयाचा भार तर राम शिंदेंचं जलसंधारण शिवसेनेच्या तानाजी सावंतांकडे
3. विनोद तावडेंचं खातं विभागून आशिष शेलारांकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी, चंद्रकांत पाटलांच्या खात्यांमध्येही कपात
4. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेसमध्ये चढाओढ, बैठकीत बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपल्याची सुत्रांची माहिती
5. विस्तारावर टोला हाणताना एकनाथ खडसेंचं पक्षबदलू विखेंकडे बोट, मंत्रिपदाचा उत्साह राहिला नसल्याची प्रतिक्रिया, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
6. मोदी सरकार- 2 च्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'वन नेशन, वन इलेक्शन'वर चर्चा होण्याची शक्यता