LIVE BLOG | भारताचे पाकिस्तानात घुसून 3 एअर स्ट्राईक, तिसऱ्या स्ट्राईकची माहिती देणार नाही : राजनाथ सिंह

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. विरोधकांच्या टीकेनंतर महाधिवक्ता वेणुगोपाल यांचं घूमजाव, राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी नाही तर फोटोकॉपी, पीटीआयच्या मुलाखतीत दावा
2. मध्यस्थीच करायची होती तर राम मंदिराचा मुद्दा 25 वर्षे सुरु का ठेवला?, 'सामना'मधून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सवाल तर मध्यस्थीवर संघही नाराज
3. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये, रस्त्यावर मुक्तपणे वावर करतानाचा व्हिडीओ समोर
4. मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर रद्द, निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय, स्वयंपुनर्विकास प्रकल्पालाही मंजुरी
5. अहमदनगरच्या जागेवर तोडगा न निघाल्यास निर्णय घेण्यास स्वतंत्र, सुजय विखे पाटील यांचं सूचक विधान, गिरीश महाजनांच्या भेटीने भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण
6. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आज श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात, मुंबईतल्या ग्रँड वेडिंगसाठी बड्या सेलिब्रिटीजना निमंत्रण























