Year Ender 2022 : वर्षभरात गुगलवर सर्वाधिक विचारले गेलेले पाच प्रश्न कोणते?
Google Trending Topics 2022: नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
Top Health Topics In 2022: नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 2022 हे वर्ष अनेक महत्वाच्या घडामोडीसाठी लक्षात राहिल. आरोग्याच्या दृष्टीनेही 2022 मध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. इंटरनेटवर नेटकऱ्यांनी आरोग्याबाबतच्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेटकऱ्यांनी इंटरनेटवर आपल्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोविन सर्वात आघाडीवर आहे. गुगलवर सर्वाधिक कोविनला सर्च केल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतेय. 2022 वर्षात इंटरनेटवर विचारले गेलेल्या पाच प्रश्न समोर आले आहेत. पाहूयात त्याबाबत...
1. How To Download वॅक्सीनेशन सर्टिफिकेट
कोरोना विषाणूपासून बचावासाठी देशभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं. कोरोनाचा धोका पाहता लसीकरण अनिवार्य करण्यात आलं होतं. खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. ट्रव्हलिंग असो अथवा चित्रपटासाठी सिनमागृहात जाणं असो... अथवा खरेदीसाठी दुकान, मॉलमध्ये जाणं असो...प्रत्येक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य होतं. अनेकांना लसीकरण प्रमाणपत्र कसं मिळवायचं माहित नव्हतं... या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगलला प्रश्न विचारले गेले. 2022 मध्ये how to download vaccination certificate हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलाय. त्यासोबत कोविन, लसीची नावेही सर्वाधिक सर्च करण्यात आली.
2. सरोगेसी म्हणजे काय? What is Surrogacy?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) 2022 मध्ये सरोगेसीच्या (surrogacy) मदतीनं आई झाली. त्याशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारानं सरोगेसीच्या मदतीनं जुळ्या बाळांना जन्म दिला. या बातम्या गुगलवर सर्वाधिक सर्च झाल्या. या बातम्यानंतर इंटरनेटवर सरोगेसी म्हणजे काय? What is Surrogacy? हा प्रश्न सर्वाधिक सर्च केला गेला.
एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल तर ते एका महिलेच्या गर्भामध्ये त्यांचे मूल वाढवू शकतात. ज्या जोडप्याला बाळ हवं आहे, त्या जोडप्यामधील पुरुषाचे शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो. तो गर्भ एका वैद्यकिय प्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भामध्ये ठेवला जातो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं.
3. समांथा रूथला झालेला मायोसिटिस -
फॅमिली मॅन 2 मध्ये दमदार अभिनय करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला 2022 मध्ये मायोसिटिस हा आजार झाला.... समांथानं याची माहिती चाहत्यांना दिली.... त्यानंतर इंटरनेटवर याबाबत लोकांनी ‘What is myositis’हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केला.
मायोसिटिस हा ऑटोइम्यून कंडिशन (Autoimmune Condition Myositis) असलेला आजार आहे. आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते असंही म्हटलं जातं. मायोसिटिस ही एक अशी ऑटोइम्युन कंडिशन असते ज्याचा परिणाम शरीरातील मांस पेशींवर होतो.
4. सब्जा आणि जवसाचे बिया
2022 मध्ये लोकांनी सब्जा आणि जवसाच्या बियाचे फायदे सर्च केले आहेत. कोरोना महामारीच्या काळात लोकांची आरोग्यप्रति जागृकता निर्माण झाली. सब्जाच्या बियांना सुपरफूड म्हटले जाते... त्याचप्रमाणे जवसाच्या बिया अनेक आजारांवर परिणामकारण आहेत. 2022 वर्षात या गुगगलवर सब्जा आणि जवसाच्या बियाचे फायदे सर्च करण्यात आले.
5. हाउ टू स्टॉप मोशन इन प्रेग्नेंसी ( how to stop Loose Motion During Pregnancy )
गरोदरपणात पोटाच्या समस्या सामान्य आहेत, पण याप्रकारचे प्रश्न 2022 या वर्षात इंटरनेटवर अनेक विचारण्यात आले आहेत. गुगलला विचारलेल्या प्रश्नात महिलांच्या बाबतीतील प्रश्न पाचव्या क्रमांकावर आहे. स्टॉप मोशन ड्युरिंग प्रेग्नेंसी बाबात भारतामध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले अन् प्रश्न विचारण्यात आलेत.