World Environmental Health Day 2023 : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन विशेष; आरोग्य अन् पर्यावरण नीट ठेवण्यासाठी 'ही' झाडं नक्की लावा
World Environmental Health Day 2023 : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
World Environmental Health Day 2023 : दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. पर्यावरणाच्या चांगल्या आरोग्याचा मानवी आरोग्यावरही थेट परिणाम कसा होतो या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो.
पर्यावरण आणि आरोग्य एकमेकांना पूरक आहेत. तुमचं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु शहरांमधील वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतोय. अशा वातावरणात निरोगी राहण्यासाठी निसर्गाचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या आजूबाजूला, घरात झाडे लावा. आणि हवा शुद्ध ठेवा. या ठिकाणी आम्ही तुम्हाला घरी लावण्यासाठी काही खास वनस्पतींची नावं सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचं आरोग्यही जपता येईल आणि पर्यावरणाचं सौंदर्यही राखता येईल.
तुळस
घराच्या अंगणातील तुळशीमुळे हवा शुद्ध होते. असे मानले जाते की, तुळशीची वनस्पती हवेतून सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साइड इत्यादी विषारी वायू शोषून घेते. वनस्पती डासांपासून बचाव करणारे गुण घेऊन डासांना दूर ठेवते.
स्पायडर प्लांट
हे वातावरणातील कार्बन मोनोऑक्साइड आणि इतर अशुद्धता काढून टाकते. घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी ही वनस्पती उत्कृष्ट आहे. हे फॉर्मल्डिहाइड गॅस देखील कमी करते.
बांबू वनस्पती
ही वनस्पती हानिकारक फॉर्मल्डिहाइड वायू शोषून घेण्याचे काम करते आणि घरातील आवश्यक नैसर्गिक ओलावा देखील राखते.
अरेका पाम
हवा शुद्ध करण्यासाठी ही एक उत्कृष्ट वनस्पती आहे. ही वनस्पची घरी लावल्याने घरातील आणि आजूबाजूची हवा शुद्ध होते.
ग्राउंड लिली
या नवस्पतीला पांढरी फुले येतात. हे फॉर्मल्डिहाईड आणि ट्रायक्लोरेथिलीन विषारी वायूंचा प्रभाव देखील काढून टाकते.
बोगनविले
ही वनस्पती हवेतील सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन हे हानिकारक वायू शोषून घेते. प्रतिबंध करून प्रदूषणावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :