Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा
Health Tips : नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार आणि पॅरोलाईज्ड यांसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
Health Tips : निरोगी राहण्यासाठी फक्त पौष्टिक आहारच नाही तर पुरेशी झोपही (Sleep) खूप गरजेची आहे. चांगली झोप मिळाली की आरोग्यही (Health) निरोगी राहतं. पण, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच, यामुळे तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलवरही परिणाम होतो.
नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार आणि पॅरोलाईज्ड यांसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
झोप न लागणे नुकसानकारक असू शकते
2021 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, झोपेची कमतरतेमुळे एखादी व्यक्ती अनेक समस्यांना, सवयींना बळी पडते, ज्यामुळे तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचते. यामुळे तणावाची पातळी वाढणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टी लोकांना बळी पडू शकतात. याव्यतिरिक्त, जे प्रौढ व्यक्ती रात्री सात तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना हृदयविकार आणि नैराश्य यांसह आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
अभ्यास काय म्हटलंय?
या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, नियमित झोप न घेतल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज रात्री 7-9 तास झोपावे. वेळेव्यतिरिक्त, तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे, कारण दिवसभरात तुम्हाला किती प्रसन्न वाटते हे तुमच्या झोपेवर अवलंबून आहे.
चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, अपुरी झोपेमुळे तुमच्या आरोग्याचं नुकसान होते. अशा परिस्थितीत, तुमची झोप पूर्ण करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही योग्य सवयी आणि चांगल्या खाण्याच्या सवयींचे पालन करणं गरजेचं आहे.
चांगली झोप हवी असेल तर या टिप्स फॉलो करू शकता
- चांगली झोप येण्यासाठी तुमच्या झोपेचे वेळापत्रक तयार करा. दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ सेट करा.
- झोपण्यापूर्वी कॅफिन, अल्कोहोल, निकोटीन आणि जड अन्नाच सेवन टाळा. हे अन्नपदार्थ तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
- झोपण्यासाठी आरामदायक वातावरण तयार करा. तुमची बेडरूम गडद आणि शांत, थंड आणि आरामदायक असल्याची खात्री करा.
- झोपण्यापूर्वी स्क्रीन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा. टीव्ही, संगणक, स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांसारख्या उपकरणांमधला ब्लू लाईट मेलाटोनिन कमी करू शकतो.
- निरोगी राहण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी नियमित व्यायाम करा. शारीरिक क्रियाकलाप तणाव कमी करून तुमचा मूड सुधारतो आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते.
- झोपताना कोणताही व्यायाम करू नका.
- दिवसा झोपणे टाळा. दिवसा झोपण्याची सवय लागल्यास रात्री तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही.
- तुम्हाला झोपेची समस्या असल्यास किंवा नियमितपणे झोप न येण्यास त्रास होत असल्यास, एखाद्या तज्ञाची मदत घ्या.