Health Tips : वर्क फ्रॉम होम केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावरही परिणाम होतोय? 'या' टिप्स फॉलो करा
Work From Home Tips : वर्क फ्रॉम होम करताना स्वतःची काळजी घेणे आव्हानात्मक होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांनी त्रस्त होऊ शकता.

Work From Home Tips : जे घरून काम करतात त्यांच्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आव्हानात्मक होते. कारण तुम्ही ऑफिसचे काम करता आणि तुम्हाला घरची कामेही करावी लागतात. अशा स्थितीत तुमचे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टीचा कामावर परिणाम होऊ लागतो. काही लोक असे असतात जे डोळे उघडताच लॅपटॉप उघडतात आणि दिवसभर काम करत राहतात. तुमच्यासाठी असे करणे योग्य नाही. यासाठी काही टिप्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.
वर्क फ्रॉम होम करताना त्वचेची आणि आरोग्याची काळजी घ्या
1. वर्क फ्रॉम होम करताना जास्तीत जास्त पाण्यावर भर द्या. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. तसेच हे एकंदर आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी पाणी प्यायल्याने पचनशक्ती बिघडू शकते. शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करा.
2. जास्त साखर, कार्ब आणि फॅट तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे मुरुमांबरोबर पुरळ येण्याचा धोका असतो. त्याचबरोबर हे सर्व पदार्थ तुमच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. मधुमेहासारख्या समस्याही उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत हे फास्ट फूड आणि गोड पदार्थ खाण्याऐवजी फळे आणि ज्यूस प्या. तुमच्या त्वचेलाही याचा फायदा होईल आणि तुमच्या शरीरालाही फायदा होईल.
3. जर तुम्ही घरून काम करत असाल तर नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि तुम्ही हेल्दी आणि फिट राहता. यामुळे तुम्हाला निरोगी आणि तजेलदार त्वचा देखील मिळते. घाम तुमच्या शरीराला डिटॉक्स करतो. त्वचेतील घाण काढून टाकते आणि पोर्स उघडण्यास मदत करते. पुरळ प्रतिबंधित करते. व्यायाम केल्याने तुमचे वजनही योग्य राहते आणि तुम्हाला सांधेदुखी सारखी कोणतीही समस्या होत नाही.
4. जर तुम्ही जास्त वेळ स्क्रीनवर काम करत असाल तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही नुकसान पोहोचू शकते. अशा परिस्थितीत वेळोवेळी विश्रांती घ्या, डोळ्यांना विश्रांती द्या आणि डोळ्यांवर पाणी शिंपडा.
5. तुम्ही घरी असलात तरीही तुम्ही तुमचे CTM म्हणजेच क्लिंझर, टोनर आणि मॉइश्चरायझरचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खात्री करा. तसेच सनस्क्रीन लावा. यामुळे तुमची त्वचा परिपूर्ण राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
