एक्स्प्लोर

नीता अंबानींनी लॉन्च केला 'Her Circle EveryBODY' प्रोजेक्ट, समाजातील भेदभाव कमी करण्यासाठी प्रयत्न

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  संचालिका नीता अंबानी  (Nita Ambani) यांनी  'द हर सर्किल, एवरीबॉडी प्रोजेक्‍ट' (Her Circle EveryBODY) लाँच केला आहे.

Nita Ambani New Project : जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  संचालिका नीता अंबानी  (Nita Ambani) यांनी  'द हर सर्किल, एवरीबॉडी प्रोजेक्‍ट' (Her Circle EveryBODY) लाँच केला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारचे शारीरिक भेदभाव आणि असमानता विसरून सकारात्मकतेचा संवाद साधण्याचा प्रयत्न होईल. जे आजच्या नकारात्मक वातावरणात खूप महत्त्वाची आहे.

दरम्यान, 2021 मध्ये नीता अंबानी यांनी 'हर सर्किल' लॉन्‍च केले होते. या सोशल प्लॅटफॉर्मला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. दोन वर्षात हा प्लॅटफॉर्म लाखो महिलांसाठी मोठा मंच झालाय. देशभरातील जवळपास 31 कोटी महिलांपर्यंत हर सर्कल पोहचले आहे. 

देशातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या प्रकल्पामागील आहे.  भारतातील आघाडीचे डिजिटल कंटेंट आणि महिलांसाठी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म 'हर सर्कल' हा कोट्यवधी महिलांसाठी उलपब्ध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला आणि मुली अधिक जागरूक होतील, आणि त्यांचा सर्वांगीन विकास होईल, हा नीता अंबानी यांचा प्रयत्न असेल. 

नीता अंबानी काय म्हणाल्या?

लाँचिंगवेळी नीता अंबानी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा आकार, रंग, धर्म, वय, न्यूरो-विविधता आणि शरीर यांच्याशी संबंधित सर्व भेदभाव दूर करणे हा आहे. त्याशिवाय या सर्वांना समान वागणूक देणे हाही उद्देश आहे. सर्वांनी यासाठी काम केले पाहिजे  आणि इतरांनाही प्रवृत्त करायला हवं. कोणताही निर्णय न घेता समाजातील प्रत्येकाच्या मनात दयेची भावना निर्माण होऊन ती वाढवता येईल, हा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.
 
हर सर्कल बंधुत्वाता आणि एकत्रतेबद्दल आहे. सर्वांसाठी समानता, समावेश आणि आदर यावर आधारित एकता हे यामागील मुख्य उद्देश आहे. आपण सर्वांनी ट्रोलिंग पाहिले आहे, ज्यात सोशल मीडियावर लोकांचे मतभेद, महिलांचा संघर्ष, वैद्यकीय समस्या, काही जनुकीय कारणे असू शकतात. ज्यातून लोक जात आहेत आणि तरीही त्यांना ट्रोल करत आहेत. अशा ट्रोलिंगमुळे अनेकांना अपमान सहन करावा लागतो. हे खूप धोकादायक आहे. विशेषकरुन तरुण वर्गाला याचा जास्त फटका बसू शकतो. त्यामुळे आमच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मला आशा आहे की आमचा उपक्रम लोकांना ते खरोखरच काय आहे असा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य देऊ शकेल, असे नीता अंबानी म्हणाल्या.  

'हर सर्कल' कसं काम करते ?
 महिलांशी संबंधित कंटेटचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याच्या उद्देशाने हर सर्कल या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली.  हर सर्कल पोर्टलवर निरोगीपणा, वित्त, वैयक्तिक विकास, समुदाय सेवा, सौंदर्य, फॅशन, मनोरंजन यासारख्या विस्तृत विषयांवर व्हिडिओ पाहू शकतात. त्याशिवाय लेखही वाचू शकतात.  हा कंटेट हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaOBC Bahujan Party :कोल्हापुरात शाहू महाराज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठींबाTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaOBC Bahujan Party : ओबीसी बहुजन पार्टीची मोठी घोषणा; वंचितचा प्रस्ताव फेटाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Embed widget