Fitness: अरेच्चा.. बटाटे आणि अंडी खाऊन चक्क 31 किलो वजन कमी केलं? फिटनेस प्रशिक्षक महिलेचा दावा, जाणून घ्या
Fitness: वजन कमी करण्याच्या आहारात बटाटे खाणे टाळले जाते. पण एका महिला फिटनेस प्रशिक्षकाने बटाटे आणि अंडी खाऊन 31 किलो वजन कमी केले आहे. कसं शक्य आहे? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
Fitness: आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांना फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे विविध आजारांनी लोकांना ग्रासलय, त्यात वाढतं वजन ही देखील एक गंभीर समस्या बनत चाललीय. झटपट वजन कमी करण्याच्या नादात तज्ज्ञांचा सल्ला न घेता अनेकजण विविध उपाय करतात. तसं पाहायला गेलं तर अंडी आणि बटाटे संतुलित आहाराचा भाग असू शकतात. पण त्यामुळे वजन कमी होऊ शकते ही वस्तुस्थिती पचायला थोडी अशक्य वाटते. हो ना..? अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तर बटाट्यामध्ये कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. बटाट्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट वजन वाढवते. कोलेस्टेरॉलमुळेही अनेक समस्या निर्माण होतात, मात्र या दोघांमुळे एका फिटनेस प्रशिक्षकाचे चक्क 31 किलो वजन कमी झाले आहे. कसे शक्य झाले हे माहित आहे?
ही महिला कोण आहे?
अलीकडेच, लिडिया इनस्ट्रोझा या अमेरिकन फिटनेस कोचने सोशल मीडियावर एक रील शेअर केले होते, त्यात तिने नाश्त्यात बटाटे आणि अंडी खाल्ल्याने वजन कमी झाले असे म्हटले. लिडियाने तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे दावा केला आहे की, हा तिचा आवडता नाश्ता आहे, जे खाल्ल्याने तिचे वजन कमी झाले आणि ती अजूनही नियमितपणे खाते.
View this post on Instagram
या दोन गोष्टी एकत्र कशा खाता येतील?
यासोबतच लिडिया इनस्ट्रोजा हिने कॅप्शनमध्ये काही माहिती देखील दिली आहे, ज्यामध्ये तिने बटाटे आणि अंड्याची रेसिपी शेअर केली आहे. ती सांगते की ते बनवण्यासाठी ती बटाट्याचे लहान तुकडे करते, त्यात मीठ, काळी मिरी पावडर, लसूण पावडर आणि पेपरिका घालते. यानंतर ऑलिव्ह ऑईल लावून एअर फ्रायरमध्ये शिजवून घेते. यासोबत ती स्क्रॅम्बल्ड अंडी खाते. हे करण्यासाठी, ती ऑलिव्ह ऑइलमध्ये टोमॅटो आणि कांदे फ्राय करून घेते, 3-4 अंडी फोडून त्यात टाकते, मिक्स करून 2 मिनिटे शिजवते. या पद्धतीने तयार केलेला बटाटा आणि अंड्यांचा नाश्ता ती रोज खाते. लिडिया म्हणते, हा नाश्ता तिची चयापचय मजबूत करण्यास मदत करतो आणि ऊर्जा देखील देतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आरोग्य तज्ज्ञ डॉ.सोनी यांच्या मते, बटाटा आणि अंड्याची ही वजन कमी करण्याची रेसिपी रोज खाल्ल्याने वजन कमी होत नाही. या पाककृती वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केल्या जाऊ शकतात, परंतु आपण त्या नियमित खाल्ल्याने वजन कमी होऊ शकत नाही. बटाटे आणि अंडी खाण्यासोबतच तुम्ही एका दिवसात किती कॅलरीज वापरत आहात, याकडेही लक्ष द्यावे लागेल. वजन कमी होणे यावर अवलंबून असते.
हेही वाचा>>>
Fitness: 'धकधक गर्ल' आणि तिच्या पतीचं फिटनेस सीक्रेट सापडलं? डॉ. नेनेंनी सांगितलं नाश्ता कसा असावा? काय खाऊ नये? एकदा पाहाच
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )