Weight Loss Tips : पोट कमी करण्यासाठी सोप्या वर्कआउट टिप्स; काही दिवसांतच दिसेल परिणाम
पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच व्यायाम करू शकता. तसेच चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे डाएट देखील बदलले पाहिजे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात.
Belly Fat Loss Exercise : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळी लवकर उठून वर्क आउट करतात. पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच व्यायाम करू शकता. तसेच चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे डाएट देखील बदलले पाहिजे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात. पाहा असे वर्क आउटचे प्रकार जे घरच्या घरीच करून तुम्ही बेली फॅट कमी करू शकता.
पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तळलेले आणि मसाल्याचे पदार्थ खाणे कमी करावे लागेल. तसेच डाएटमध्ये तुम्हाला फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. तसेच पॅक फूड खाऊ नये. पाहूयात पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम-
1-पुश थ्रो (Push Through)
2- -हील टच (Heel Touches)
3- टो टच (Toe Touches)
4- क्रोस हैंड क्रन्चिस (Cross Hand Crunches)
शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.
Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?
झोप पूर्ण करा
जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजनावर होतो. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा