Weight Loss Exercise: डाएट करूनही पोटाची चरबी कमी होत नाही? घरीच करा एक्सरसाइज; बेली फॅट लगेच होईल कमी
जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat ) कमी करायची असेल तर या तीन एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता.
Belly Fat Loss Tips : शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने अनेकांच्या शरीराची चरबी वाढते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat ) कमी करायची असेल तर या तीन एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता.
बेली फॅट बर्न करण्यासाठी या तीन एक्सरसाइज नक्की करा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योगा, डान्स आणि जम्प रोप वर्कआउटकरू शकता तसेच हे तीन एक्सरसाइज केल्याने देखील तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते.
1- पुश अप्स एक्सरसाइज- पुश-अप्स केल्याने पोटाची चरबी झटपट कमी होते. तसेच पुश-अप केल्याने ब्लड सर्क्यूलेशन देखील चांगले होते. पुश-अप केल्याने कॅलरी बर्न होतात त्यामुळे बेली फॅट कमी होते.
2- पुल-अप्स एक्सरसाइज- पुल-अप्स हा एक प्रकारचा कार्डियो एक्सरसाइज आहे. ज्यामुळे शरीर लवचिक होते. तसेच पुल-अप्स केल्याने लहान मुलांची उंची देखील वाढते.
3- स्कॉट्स एक्सरसाइज- जर तुम्हाला घरच्या घरी झटपट वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी तुम्ही स्कॉट्स एक्सरसाइज केला पाहिजे. स्कॉट्स एक्सरसाइजमुळे पचन शक्ती चांगली होते.
दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते. तसेच पाणी देखील भरपूर प्यावे. पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात. दिवसभरात पाणी पित राहावे.
(टीप- एबीपी माझाच्या लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आलीय. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हे देखील वाचा :
Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन
Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )