एक्स्प्लोर
आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!
नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या 'उबर'ने सोमवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांसाठी प्रायोगिक तत्त्वावर 'उबरपास' सेवा सुरु केली आहे. या नव्या सेवेमुळे 'उबर'नं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.
'उबर' इंडियाचे महाप्रबंधक शैलेश सावलानी यांनी सांगितलं की, 'उबर'नं दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सेवा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा या चार महानगरातील प्रवाशांना आवडली, तर इतरही शहरांमध्ये सुरु करण्याचा आमचा मानस आहे.
'उबरपास'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही उत्पादनं आणि सेवा वापरण्याची सोय केली जाणार आहे. तसेच या प्रवाशांसाठी चांगल्या रेटिंगचे ड्रायव्हर पाठवले जाणार आहेत. याशिवाय, भाड्यात सवलत, आणि जर गाडी कॅन्सल केल्यास त्यामध्येही सवलत सारख्या सुविधा या नव्या सेवेतून मिळणार आहेत.
सध्या 'उबर'ची ही सेवा प्रायोगित तत्त्वावर ही सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता आदी शहरांसाठीच कार्यन्वित होणार असून, यातील शहरांसाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement