Salt Balance : जेवणात चुकून जास्तीचं मीठ पडलंय? काळजी करू नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि खारटपणा कमी करा!
Salt Balance : कधी कधी स्वयंपाक करताना आपल्या हातून एखाद्या पदार्थात चुकून जास्त मीठ पडतं, अशावेळी संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी तुम्ही तो पदार्थ फेकून देत असाल तर थांबा! आधी हे वाचा..
Salt Balance : एखाद्या पदार्थाची चव तेव्हाच वाढते, जेव्हा त्यात योग्य प्रमाणात मीठ (Salt) मिसळलं जातं. जेवणातील मिठाचे प्रमाण एखाद्या पदार्थाची चव जशी वाढवू शकतं, तशी ती बिघडवू देखील शकतं. आपण अनेकवेळा पाहतो की, जेवण बनवणारा व्यक्ती अनेकदा आपण करत असलेल्या जेवणाची चव चाखून त्यातील मीठाचा अंदाज घेत असतो. कधी कधी स्वयंपाक बनवण्याच्या गडबडीत त्यात मीठ चुकून जास्त पडते. अशा वेळी तो पदार्थ तर खारट होतोच, पण संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी अनेकदा तो पदार्थ फेकून देण्याची वेळ येते. तुम्ही देखील असंच करत असाल, तर थांबा! आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हा अनावश्यक खारटपणा कमी करता येईल...
दही
आपल्यापैकी बरेच लोक जेवणासोबत दही देखील खातात. दही जेवणाची लज्जत तर वाढवतेच, पण जेवणात पडलेले अधिकचे मीठ कमी करण्यासाठी देखील दही उपयोगी पडते. भाजीत जास्त झालेले मीठ कमी करण्यासाठी त्यात एक वाटी दही मिसळा आणि भाजीला एक उकळी येऊ द्या. भाजीत दही मिसळल्याने त्यातील मिठाचे प्रमाण कमी होते आणि भाजीची चव देखील वाढते.
भाजलेले बेसन
भाजीत मीठ जास्त झाले असले तर, अशावेळी बेसन देखील कामी येते. यासाठी एक चमचा बेसन भाजून घ्या आणि ते भाजीत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिसळा. भाजीत बेसन टाकताच त्यातील मीठ संतुलित होईल.
उकडलेला बटाटा
उकडलेल्या बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची असली, तरी उकडलेले बटाटेहे जेवणातील अतिरिक्त मीठ देखील कमी करू शकतात. यासाठी भाजीतील ग्रेव्हीच्या प्रमाणानुसार उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. आता हा उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा भाजीत मिसळा. याने भाजीतील मीठ लगेच कमी होईल. भाजीतच नव्हे तर, बटाटे डाळीतील किंवा आमटीमधील अतिरिक्त मीठही कमी करू शकतात.
लिंबाचा रस
एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले तर त्यात थोडासा लिंबू पिळताना आपण आपल्या आईला पहिलेच असेल. एखाद्या पदार्थात पडलेले अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. सुकी भाजी असो वा ग्रेव्ही भाजी किंवा पोहे, अशा पदार्थांमध्ये मीठ जास्त झाले असेल तर, त्यात गरजेनुसार 2 ते 3 चमचे लिंबाचा रस मिसळू शकता. याने मीठाचे प्रमाण संतुलित होईल.
हेही वाचा: