एक्स्प्लोर

Korean Glass Skin: ‘कोरियन ग्लास स्किन’ हवीय? मग, ‘या’ ब्युटी टिप्स खास तुमच्यासाठी...

Skin Care Routine: पावसाळा सुरू झाला की, त्वचा निस्तेज होणे, पिंपल्स आणि इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

Korean Skin Care Routine : तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं. पावसाळ्याच्या काळात मात्र त्वचा निस्तेज दिसू लागते आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू लागतात. या काळात त्वचा निस्तेज दिसू लागते. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचा कधी तेलकट होते, तर कधी कोरडी पडते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.

निरोगी त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी बाजारात मिळणारे महागडी उत्पादने विकत घेण्याची गरज नसते. अशावेळी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील काही नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते. चला तर मग जाणून घेऊया की, किचनमध्ये असलेल्या गोष्टींचा वापर करून चमकदार ‘कोरियन ग्लास स्किन’ कशी मिळवता येईल...

शुगर स्क्रब

शुगर स्क्रब अर्थात साखरेचा स्क्रब हा त्वचेला एक्सफोलिएट करण्याचा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. 10 मिनिटांचा शुगर स्क्रब मृत त्वचा काढून टाकून, रक्ताभिसरण वाढवण्यात मदत करतो. घरच्या घरी शुगर स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला केवळ साखरेची गरज आहे. अर्धा चमचा खोबरेल तेलात एक चमचा साखर चांगली मिसळा आणि त्याने त्वचेला स्क्रब करा. साखरेसोबत असलेले नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करून, त्वचेचा ग्लो कायम ठेवण्याचे काम करते.

तांदळाचे पाणी

त्वचा चमकदार ठेवण्यासाठीचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावणे. तांदळाचे पाणी अतिनील किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान दूर करण्यास मदत करते. तांदळाचे पाणी कोलेजनच्या निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे तुमची त्वचा काचेसारखी बनते. तांदळाचे पाणी बनवण्यासाठी तांदूळ पाण्यात उकळून ते पाणी गाळून एका स्प्रे बाटलीत भरून ठेवावे. 2-3 दिवसांनी या पाण्याचा वापर करावा.

मध

मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केवळ त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करत नाहीत, तर त्वचा दीर्घ काळ चमकदार ठेवण्यासही मदत करतात. मधात इतरही अनेक पोषक घटक आढळतात. त्वचेवर लावण्यासाठी केवळ सेंद्रिय आणि शुद्ध मधाचाच वापर करावा.

व्हिटॅमिन सी आणि ई सीरम

ज्याप्रमाणे शरीराला जीवनसत्त्वांची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेलाही जीवनसत्त्वांची गरज असते. यासाठी आपण व्हिटॅमिन कॅप्सूलचे सेवन करू शकता किंवा व्हिटॅमिन सीरम थेट त्वचेवर लावू शकता. दररोज सकाळी थंड पाण्याने स्वच्छ केल्यानंतर सीरम लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक घट्ट होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
SpaDeX, Space Docking Experiment : तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
Walmik Karad : चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahu Maharaj Kalammawadi Dam : खासदार शाहू महाराजांकडून काळम्मावाडी धरणाची पाहणीDada Bhuse Nashik : दादा भुसेंचा पदग्रहण सोहळा; विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवानाCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 डिसेंबर 2024 :  ABP MajhaWalmik Karad Last Location : फरार वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये; संकटकाळी देवाच्या दारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
SpaDeX, Space Docking Experiment : तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
Walmik Karad : चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Embed widget