Skin Care Tips : उन्हाळ्यात चेहरा सतत धुताना फॉलो करा 'या' टिप्स; त्वचेचा ग्लो राहील टिकून!
त्वचेची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्ही उन्हाळ्यामध्ये फॉलो करू शकता.
Skin Care Tips : उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये देखील त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, रॅश येणे इत्यादी समस्या तुम्हाला जाणवतील. त्वचेची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्ही उन्हाळ्यामध्ये फॉलो करू शकता.
टाकीमध्ये साठलेल्या पाण्यानं चेहरा धुताना घ्या ही काळजी
अनेक लोक उन्हाळ्यामध्ये सतत घाम येत असल्यानं चेहरा थंड पाण्यानं धुतात. पण टाकीमध्ये साठलेलं पाणी हे उन्हामुळे गरम झालेले असते. त्यामुळे टाकीमध्ये साठलेल्या पाण्यापेक्षा बॉटलमध्ये ठेवलेल्या साध्या पाण्यानं चेहरा धुवा. त्यामुळे चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल.
उन्हाळ्यामध्ये चेहरा फेसवॉशनं धुतल्यानंतर मानेच्या भागामध्ये आणि चेहऱ्यावर बर्फाचा तुकडा फिरवा. त्यानंतर चेहऱ्याला मॉयश्चराइजर लावा. ज्यामुळे घामामुळे त्वचेवर चिकटपणा येणे किंवा रॅश येणे या समस्या जाणवणार नाही. वॉटर बेस्ड मॉयश्चराइजर देखील तुम्ही लाऊ शकता. क्लिंजिंग क्रिम, विटॅमिन सी सिरम आणि हायड्रेटिंग फेसमास्कचा वापर देखील तुम्ही करू शकता. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रिनचा वापर करावा. सनस्क्रीन लावल्यानंतर टॅनिंग होत नाही.
4. योग्य प्रमाणात पाणी प्या-
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायल्यानं त्वचा तजेलदार होते. तसेच पचन क्रिया चांगल्या पद्धतीनं होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : सावधान! सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी करू नका, शरीरासाठी ठरेल घातक
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha