एक्स्प्लोर
Advertisement
Skin Care : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा असा करा वापर
हळद आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही हळदीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : हळद आपल्या घरात अतंयत सहज उपलब्ध होते. मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट केली जाणारी हळद आरोग्यासोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही हळदीच्या अनेक गुणकारी फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे. अनेक त्वचेच्या समस्या अगदी सहज दूर करण्यासाठी हळद मदत करते. पिंपल्स आणि अॅक्ने दूर करण्यासाठीही हळद फायदेशीर ठरते. जाणून घेऊया त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर कसा करवा त्याबाबत...
हळदीचा चहा प्या :
हळदीचा चहा बाजारांमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो. गरम पाण्यात हळदीच्या चहाची टीबॅग टाकून त्या चहाचे सेवन करा. हे अत्यंत आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
हळदीचा फेस पॅक : हळदीचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळदीची पावडर, मध आणि तीन चमचे दही एकत्र करा. या तिनही गोष्टी एकत्र केल्यानंतर त्वचेवर लावा. हा मास्क तुम्ही अर्धा तासांसाठी ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
हळदीच्या साबणाचा वापर करा : हळदीचा साबण त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतो. त्यामुळे आंघोळ करण्यासाठी क्लिंजरऐवजी हळदीच्या साबणाचा वापर करणं आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो.
हळदीचा आहारात समावेश करा : जेवणात हळदीचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच हळदीचं दूध आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.
लिंबाचा रस आणि हळद : लिंबाच्या रसामध्ये एक नैसर्गिक अॅन्टिसेफ्टिक आणि अॅन्टिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लिंबाचा रस आणि हळद त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच पिंपल्स आणि अॅक्नेवरही फायदेशीर ठरतं. दोन चमचे लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये हळदीची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. पिंपल्सवर थेट पेस्ट लावा. 15 मिनिटांसाठी ठेवा आणि थंड पाण्याने धुवून टाका.
टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते
संबंधित बातम्या :
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स; होतील भरपूर फायदे
नाश्त्यासाठी पोहे खाल्याने होऊ शकतं वजन कमी; पण कसं?
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement