एक्स्प्लोर

Chickenpox New Variant : भारतात आढळला कांजण्याचा नवा व्हेरिएंट , 'ही' आहेत लक्षणं

शास्त्रज्ञांना भारतात कांजण्याचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. कांजण्याच्या या प्रकाराला 'क्लेड 9' म्हटले जात आहे. क्लेड 9 व्हायरसची लक्षणे जाणून घेऊयात.

Chickenpox New Variant : कांजण्या हा मुळातच संसर्गजन्य रोग आहे. आपल्यापैकी अनेकांना कांजण्या येऊन गेल्या आहेत. मात्र आता एक चिंताजनक बातमी नुकतीच शास्त्रज्ञांनी दिली आहे. शास्त्रज्ञांना भारतात कांजण्याचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मंकीपाॅक्सच्या संशयित रूग्णांची तपासणी करत असताना कांजण्याच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रकार आढळून आल्याचे सांगितले जात आहे. कांजण्याच्या या प्रकाराला 'क्लेड 9' म्हटले जात आहे. व्हेरिसेला झोस्टर व्हायरसमुळे पसरणारा हा आजार भारतापूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट ज्यावेळी भारतात आढळून आला आहे, तेव्हापासून हेल्थ एक्सपर्टच्या माध्यमातून या आजाराच्या उपचारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. क्लेड 9 हा व्हायरस खोकल्यातून आणि शिंकण्यातून देखील होऊ शकतो. त्यामुळे अशा रूग्णांपासून लांब राहावे. काय आहेत क्लेड 9 व्हायरसची लक्षणे जाणून घेऊयात.

क्लेड 9 ची लक्षणे काय आहेत? (What Are The Symptoms Of Clade 9?)

डाॅक्टरच्या म्हणण्यानुसार क्लेड 9 व्हायरसची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. कोणत्याही रूग्णाच्या शरीरावर ही लक्षणे दिसण्याकरता दोन-तीन आठवडे लागतात. सुरूवातीस फक्त छातीवर आणि चेहऱ्यावर लहान लहान पुरळ येतात. यानंतर संपूर्ण शरीरावर पुरळ दिसू लागतात. लालसर पुरळ येऊन ते थोडेसे मोठे होतात आणि काही दिवसांमध्ये त्यात पाणी भरलं जातं. काही दिवसांनी ते फुटून, सुकून जातात. या पुरळांमुळे सगळ्या शरीरावर खाज सुटते. तसेच रूग्णाला ताप (Fever) देखील येतो. सोबतच अंग आणि डोकेदुखी सुरू होते. अशक्तपणा जाणवायला लागतो आणि भूक देखील लागत नाही. दोन ते तीन आठवडे हा संसर्ग राहतो. या कालावधीत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कांजण्या होऊ शकतात. अशी लक्षण दिसल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच कांजण्या झालेल्या व्यक्तीने कधीही न झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. कारण हा व्हायरस हवेतून देखील पसरू शकतो. अशी परिस्थितीत योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

काळजी कशी घ्याल? (How Do You Care?)

क्लेड 9 टाळण्याचा उत्तम पर्याय म्हणजे लसीकरण करणे. याशिवाय स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात धुवा. खोकताना आणि शिंकताना तोंडाला हात लावा. शरीरात लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा.

इतर महत्वाच्या बातम्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget