World: सैन्यावर सर्वात जास्त खर्च करतो 'हा' देश; पाहा भारत कितव्या क्रमांकावर?
Largest Defence Spender: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाकडे आहे हे सर्वांनाच माहीत असेल, पण कोणता देश सैन्यावर सर्वाधिक खर्च करतो हे तुम्हाला कदाचितच माहीत असेल.
Largest Defence Spender Country: जर जगातील सर्वात मोठ्या लष्करी संघटनेबद्दल बोलायचं झालं तर ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 मध्ये या संघटनेची स्थापना झाली, ज्यात अनेक देशांचा एकत्रित समावेश आहे. हे तर झालं बलाढ्य सैन्याबद्दल. पण जगातील कोणता देश सैन्यावर (Army) सर्वाधिक पैसे खर्च करतो हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल. सैन्यावर सर्वाधिक पैसे खर्च करणारे देश कोणते आणि यात भारताचा क्रमांक कितवा? याबद्दल अधिक जाणून घेऊया.
हा देश करतो सैन्यावर सर्वाधिक खर्च
जर सैन्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशाबद्दल बोलायचं झालं तर अमेरिका (America) नंबर 1 वर आहे. अमेरिका हा देश सैन्यावर सुमारे 71 लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, चीन (China) देशातील सैन्यावर 23 लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यानंतर रशिया (Russia) हा देश सैन्यावर 7 लाख कोटी रुपये खर्च करत असून तो तिसऱ्या नंबरवर आहे. चौथ्या क्रमांकावर सौदी अरेबिया (Saudi Arabia) असून हा देशा सैन्यावर 6 लाख कोटी रुपये खर्च करतो. देशांची सरकारं संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) वार्षिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, जगाने एका वर्षात संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर 2.24 ट्रिलियन रुपये, म्हणजेच 183 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. या वर्षी ज्या देशाने सैन्यावर सर्वाधिक खर्च केला तो देश आहे फिनलँड. चालू वर्षात सैन्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये फिनलँड प्रथम क्रमांकावर आहे, जगाच्या 36 टक्के सैन्य खर्च हा देश करतो. त्यानंतर लिथुआनिया (27 टक्के), स्वीडन (12 टक्के) आणि पोलंड (11 टक्के) सारखे देश येतात.
सैन्याबाबत भारताची स्थिती काय?
स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, 2022 मध्ये भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश होता. 2022 मध्ये 2021 च्या तुलनेत संरक्षण खर्चात सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली. लष्करी खर्चाबाबत तयार केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, भारताच्या एकूण खर्चापैकी सुमारे 23 टक्के खर्च उपकरणं आणि पायाभूत सुविधांवर होतो. चीनच्या सीमेवर जास्त तणाव असल्याने त्या ठिकाणी संरक्षण उपकरणं जास्त प्रमाणात उपलब्ध करुन दिली जातात.
मात्र, भारतात लष्करी खर्चाचा मोठा भाग हा पगार, निवृत्ती वेतन यांसारख्या खर्चावर होतो. भारत सरकारने 2022 मध्ये लष्करावर सुमारे US$81.4 अब्ज (एक अब्ज = 100 कोटी) खर्च केले आहेत, जे 2021 पेक्षा सहा टक्के आणि 2013 पेक्षा 47 टक्के अधिक आहेत.
हेही वाचा:
Politics: 'या' शहरात चुकूनही रात्र घालवत नाहीत मंत्री आणि मुख्यमंत्री; सत्ता गमावण्याची असते भीती