Health Tips : गोवर आणि कांजण्या यामध्ये नेमका फरक काय? संसर्ग झाल्यास कशी काळजी घ्याल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Health Tips : गोवरला Measeals म्हणतात आणि कांजण्यांना चिकनपॉक्स (Chicken pox) म्हणतात.
Health Tips : मुंबईसह अनेक परिसरांत सध्या लहान मुलांमध्ये गोवरची (Measles Disease) साथ सुरु आहे. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे. मात्र, या दरम्यान अनेक पालकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे गोवर आणि कांजण्या यामध्ये नेमका फरक कसा ओळखायचा? या रोगाची लक्षणं आणि उपचार सारखेच आहेत का? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होत आहेत. यावरच अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
गोवर आणि कांजण्या यामध्ये नेमका फरक काय या संदर्भात प्राध्यापक बालरोगतज्ज्ञ, एम.जे. मेडिकल कॉलेज नवी मुंबई तसेच नवी मुंबई बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाने यांनी गोवर आणि कांजण्यांमधला फरक नेमका काय? या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली आहे.
गोवर आणि कांजण्यामध्ये नेमका फरक काय?
गोवर ज्याला Measeals म्हणतात आणि कांजण्यांना चिकनपॉक्स (Chicken pox) म्हणतात. हे दोन्ही भिन्न विषाणूमुळे होणारे आजार आहेत. गोवर हा 'पॅरामिझो' विषाणूमुळे तयार होतो. तर कांजण्या या 'व्हेरिसिलाझोस्टो' या विषाणूमुळे होतो. दोन्ही आजारांमध्ये सुरुवातीला ताप येतो. आणि नंतर अंगावर रॅशेस येतात. गोवरमध्ये जे पुरळ येतात ते साधारणपणे कानाच्या मागून सुरु होऊन चेहरा आणि अंगावर पुढील दोन दिवसांत पसरते. हे साधारण लालसर आणि चपटे असे पुरळ असतात.
कांजण्यांची लक्षणं काय?
कांजण्यांमध्ये सुरुवातीला पायावर, छातीवर रॅशेस येतात आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर पसरतात. हे रॅशेस सुरुवातील लालसर पुरळ येऊन ती थोडीशी मोठी होते. आणि काही दिवसांमध्ये त्यात पाणी भरलं जातं. काही दिवसांनी ती फुटून, सुकून जाते. कांजण्यामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे पुरळ दिसू लागतात. यामध्ये काही लालसर, काही पाणी भरलेले, काही फुटलेले तर काही सुकण्याच्या स्थितीत असलेले असे अनेक पुरळ एकाच वेळी शरीरावर दिसू लागतात. कांजण्यांमध्ये मुख्यत: ताप येऊन अतिशय अशक्तपणा जाणवतो. ही कांजण्यांची लक्षणं आहेत.
गोवरची लक्षणं काय?
गोवरमध्ये डोळे लाल होणे, खोकला, श्वसनदाह अशी लक्षणे आढळतात. तसेच, शरीरावर लाल पुरळ देखील दिसू लागतात. त्यामुळे अनेकांचा गोवर आणि कांजण्यांमध्ये फरक नेमका काय याबाबत संभ्रम निर्माण होतो.
काळजी कशी घ्याल?
गोवरमध्ये कॉम्पिलिकेशन्सचे प्रमाण कांजण्यांपेक्षा जास्त प्रमाणात आहे. क्वचितच कांजण्यांमध्येसुद्धा एनकेफेलाटिक्स होऊ शकतो. जसा गोवर लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात होतो तसा कांजण्या मात्र कोणत्याही वयोगटात आधी येऊन गेलेल्या असतात. किंवा लसीकरण झालं नसेल तर होऊ शकतात. दोन्ही आजारांवर प्रभावी अशी लस उपलब्ध आहे. दोन्ही आजारांवर अचूक निदान आणि उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )