(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratha Saptami 2022 : आज रथसप्तमी म्हणजेच, आरोग्य सप्तमी; जाणून घ्या शुभ मुहूर्त
रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे.
Ratha Saptami 2022 : आज (सोमवार) रथसप्तमी (Ratha Saptami)आहे. रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी आणि अचला सप्तमी देखील म्हणले जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. असं म्हणलं जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सुख, समृद्धी आणि संतती प्राप्त होते. रथ सप्तमीला सकाळी उठून सर्वप्रथम सूर्यदेवाला नमस्कार करावासूर्यदेवाला नमस्कार करता तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे असावे. यानंतर आंघोळ करून हातात पाणी घेऊन आचमन करावे. या दिवशी लाल वस्त्र परिधान करून पूजा करावी. पाण्यात तीळ, दुर्वा, चंदन, लाल रंग आणि अक्षत मिसळून सूर्यदेवाला अर्पण करा.
शुभ मुहूर्त
आज अभिजित मुहूर्त हा 12 वाजून 13 मिनिट ते 12 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. तर विजय मुहूर्त दुपारी 02 वाजून 25 मिनिट ते 03 वाजून 09 मिनिटांपर्यंत आहे.
रथसप्तमी दिवशी पूजा आणि व्रताचे महत्व
रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे. या दिवशी सुर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असं सांगण्यात येतंय. म्हणून याला आरोग्य सप्तमीही म्हटलं जातं. सप्तमीच्या महत्वाबद्दल ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराण यातही वर्णन पहायला मिळतंय. या दिवशी पिवळी फुले, पिवळी फळे, धूप, दिवा आणि भगवान विष्णूला अर्पण करा आणि पूजा करा.
संबंधित बातम्या :
Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha