Rose Day : प्रेमाचं प्रतिक असलेलं 'गुलाब'; आपल्या प्रिय व्यक्तींना द्या अन् मनातल्या भावना व्यक्त करा
तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
Rose Day : आजपासून (7 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन वीकला (Valentines Week) सुरू होत आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. 'व्हॅलेंटाईन वीक' आणि 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) ला कपल एकमेकांना गिफ्ट्स देतात. आज रोज डे (Rose Day) आहे. बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या गुलाबाचे काय महत्व आहे.
लाल रंगाचे गुलाब (Red Rose)
लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. जर तम्ही तुमच्या पार्टनरवर प्रेम करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर तुम्ही त्यांना लाल रंगाचे गुलाब दिले पाहिजे.
नारंगी गुलाब (Orange Rose)
नारंगी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. नारंगी रंगाच्या गुलाबा देऊन तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता.
पिवळ्या रंगाचा गुलाब (Yellow Rose)
पिवाळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. एखाद्या व्यक्तीची तुम्हा आठवण येत असेल किंवा ज्या व्यक्तीसोबत तुमचे प्रेमाच्या आलिकडचे आणि मैत्रीच्या पलिकडचे नाते असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा गुलाब त्या व्यक्तीला देऊ शकता.
पांढरा गुलाब (White Rose)
पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
Rose Day 2022 : व्हॅलेंटाईन्स वीकमधील 'रोज डे' प्रेमी युगुलांसाठी असतो खास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha