Raksha Bandhan 2020 | राखी बांधण्यासाठी 'हा' आहे योग्य मुहूर्त
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. यंदा श्रावणी सोमवारी रक्षाबंधन आहे. या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे मुहूर्त आहे.
मुंबई : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक वाढते. त्यामुळे रक्षाबंधन कधी आहे, त्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात होते. परंतु सध्या रक्षाबंधनवर कोरोनाचे सावट आहे.
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. यंदा श्रावणी सोमवारी रक्षाबंधन आहे. या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे मुहूर्त आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा योग आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताला सुरुवात होत आहे.
या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. व त्या बदल्यात भाऊ बहिणीला मी सदैव तुझं रक्षण करीन असा आशिर्वाद देतो. रक्षाबंधनच्या दिवशी. दुपारी १ वाजून 47 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 28 मिनिटांपर्यंतचा काळ हा रक्षाबंधनासाठी शुभ मानला जात आहे. यानंतर रात्री 7 वाजून 10 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 17 मिनिटांपर्यंतचा काळ रक्षाबंधनासाठी शुभ मानला जात आहे. श्रावण पौर्णिमेचं अधिक महत्त्व रक्षाबंधनामुळं आहे.