एक्स्प्लोर
Advertisement
पिझ्झामुळे पर्यावरणाला मोठा धोका!
मुंबई : वाहतूक आणि कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं. मात्र, तुम्ही खाणाऱ्या पिझ्झामुळेही वायू प्रदूषण होतं, असं सांगितल्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पिझ्झाही वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतो, असे एका अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे.
पिझ्झामुळे वायू प्रदूषण कसं?
पिझ्झा बनवणाऱ्या रेस्टॉरंटमधील स्टोव्हमधून निघणाऱ्या धुराचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. किंबहुना, हा धूर वायू प्रदूषणास कारणीभूतही ठरतो, असे अॅटमॉसफेरिक एनव्हॉर्नमेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे.
‘पिझ्झा कॅपिटल’चा अभ्यास
ब्राझिलमधील साओ पावलो शहराला ‘पिझ्झा कॅपिटल’ म्हटलं जातं. या शहराचा अभ्यास करताना हे निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे, साओ पावलो शहरातील वायू प्रदूषणाचं प्रमाणही सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.
पिझ्झा स्टोव्हमध्ये जे लाकडं वापरली जातात, ती जळल्यानंतर त्यातून निघणारा धूर पर्यावरणाला घातक असल्याचे अभ्यासादरम्यान दिसून आले. विशेष म्हणजे वाहतुकीतून होणाऱ्या वायूप्रदूषणाच्या तुलनेतही अधिक प्रदूषण या धुरामुळे होत आहे.
स्टोव्हमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकडांसाठी पर्यायांचा शोध घेतला पाहिजे, असेही या जर्नलमधील अभ्यासात म्हटलं गेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement