एक्स्प्लोर

Romantic Destination : ‘व्हॅलेंटाईन डे’ला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन!

Valentine Destination : व्हॅलेंटाईनला एखाद्या रोमँटिक डेस्टिनेशनला भेट देण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही नवविवाहित जोडपे असाल आणि तुमच्या जोडीदारासोबतचा हा तुमचा पहिला व्हॅलेंटाईन असेल, तर ‘या’ रोमँटिक डेस्टिनेशन्सला भेट देऊन हे क्षण अविस्मरणीय बनवू शकता.

Valentine Romantic Destination : आपल्यापैकी अनेकांना प्रवासाची आवड असते. काहींना एकट्याने प्रवासाचा आनंद मिळतो, तर काहीजणांना त्यांच्या जोडीदारांना अतिशय रोमँटिक सहलीला घेऊन जायला आवडते. जर, तुम्ही देखील या व्हॅलेंटाईनला एखाद्या रोमँटिक डेस्टिनेशनला भेट देण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही नवविवाहित जोडपे असाल आणि तुमच्या जोडीदारासोबतचा हा तुमचा पहिला व्हॅलेंटाईन असेल, तर ‘या’ रोमँटिक डेस्टिनेशन्सला भेट देऊन हे क्षण अविस्मरणीय बनवू शकता.

मनाली

मनाली हे प्रत्येका कपलसाठी खास ठिकाण आहे. या ठिकाणचे सौंदर्य पाहून तुमचा कंटाळा दूर होईल. बर्फाच्छादित शिखरे, उंच झाडे आणि बियास नदीचे स्वच्छ पाणी सगळं काही नेत्रदीपक आहे. जर तुम्ही तुमच्या लग्नानंतर अजून कुठेच फिरायला गेला नसाल, तर मनालीला नक्कीच भेट द्या. या ठिकाणी तुम्ही तिबेटीयन मठ आणि त्यानंतर नैसर्गिक गरम पाण्याच्या झरे पाहू शकता. जवळच असलेल्या हिडिंबा देवी मंदिराला आवर्जून भेट द्या. या ठिकाणी पारंपारिक खाद्य पदार्थांची चव घेऊ घेऊ शकता. शिवाय इथले पारंपरिक कपडे देखील ट्राय करू शकता.

गुलमर्ग

काश्मीर हे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. गुलमर्गमध्ये अनेक बॉलिवूड कपल्स एन्जॉय करताना दिसतात. तुम्ही देखील तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणी सुट्टीचा आनंदही लुटू शकता. येथील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. गुलमर्गमध्ये तुम्ही गोंडोला, स्कीईंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

गोवा

गोव्याचे नाव ऐकले की, आपल्याला डोळ्यांसमोर अनेक भन्नाट प्लॅन येतात. परंतु, ठरवलेला प्रत्येक प्लॅन पूर्ण होईलच असे नाही. मात्र, जोडीदारासोबत इथे फिरण्याचा आनंद मात्र वेगळाच आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील सूर्यास्ताचे दृश्य अविस्मरणीय असते. गोव्यात उत्तम गोवन पाककृती आणि इथली पेये नक्की ट्राय करा. समुद्र किनाऱ्यांप्रमाणेच गोवा आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती गोष्ट म्हणजे ‘बेकरी’. या ठिकाणच्या बेकऱ्यांमध्ये तुम्ही स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. क्रूझवर जाऊ शकता आणि वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता. गोवा तुमच्या बकेट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.

उदयपूर

उदयपूरच्या काही भागात चमकदार-शांत तलाव, टेकड्या आणि हिरवळ यांच्या सानिध्यात तुम्ही शाही जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकता. मेवाडच्या राजघराण्यांच्या वास्तू, मंदिर आणि भव्य उदयपूर सिटी पॅलेसला भेट देऊ शकता. ‘जेएमबी’ अर्थात जोधपूर मिठाई भंडारमधले घेवर चाखण्यास विसरू नका!

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget