Health Tips : बदलत्या ऋतूमध्ये तुम्हालाही श्वसनाचा त्रास होतोय? मग, 'या' घरगुती उपायांचा वापर करा
Breathing Problem In Monsoon : पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: या ऋतूमध्ये श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
![Health Tips : बदलत्या ऋतूमध्ये तुम्हालाही श्वसनाचा त्रास होतोय? मग, 'या' घरगुती उपायांचा वापर करा Breathing Problem In Monsoon home remedies to boost respiratory marathi news Health Tips : बदलत्या ऋतूमध्ये तुम्हालाही श्वसनाचा त्रास होतोय? मग, 'या' घरगुती उपायांचा वापर करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/642a0ebfd74b568b90c6944004e1f3031658132008_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Breathing Problem In Monsoon : सध्या पावसाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत बदलत्या हवामानात श्वासोच्छवासाशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. विशेषत: पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फ्लू, व्हायरल, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या खूप वाढू शकतात. अशा वेळी या समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून आरोम मिळवू शकता. असे काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने श्वसनाच्या समस्यांवर मात करता येते. श्वसनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत हे जाणून घ्या.
काही घरगुती उपाय :
1. हळदीचे दूध : हळदीचे दूध प्यायल्याने श्वसन प्रणालीच्या समस्यांवर मात करता येते. हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते.
2. आलं : आल्यामध्ये अनेक दाहक विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्याचा गुणधर्म असतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आल्याचा रस नियमितपणे प्यायल्याने श्वसनसंस्था मजबूत होते.
3. गवती चहा : पावसाळ्यात श्वसनाचा त्रास झाल्यास हर्बल टी नक्की प्यावा. यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होऊ शकते. विशेषत: दालचिनी, आले, मध आणि लिंबू घालून तयार केलेला चहा या ऋतूमध्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
4. ज्येष्ठमध : श्वसनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मधाचे सेवन करणे फार गरजेचे असते. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मध आणि काळी मिरी एकत्र सेवन केल्यास सर्दी आणि फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Monsoon Immunity : पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आजारांपासून सुरक्षित राहा
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)