एक्स्प्लोर
सर्व्हेः तासन् तास विचारात गुंतलेलेच हुशार असतात
नवी दिल्लीः शारीरिक स्वरुपात कमी क्रियाशील असणारे आणि नेहमी विचारात गुंतलेले लोक जास्त हुशार असतात. अर्थात अशा लोकांची आयक्यू लेव्हल जास्त असते, असा समज आहे. अमेरिकेच्या एका संशोधनामुळे हा समज खरा ठरण्यास बळ मिळालं आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका विद्यापीठात हे संशोधन करण्यात आलं. संशोधकांनी संशोधनासाठी 30-30 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. एका ग्रुपमध्ये सतत विचारात हरवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये कमी विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शारीरिकदृष्ट्या क्रियाशील राहणंही आवश्यक- संशोधक
एक ग्रुप कमी क्रियाशील असल्याचं एका आठवड्यानंतर निष्पन्न झालं. सतत विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा ग्रुप होता. कमी विचार करणारे लोक लवकर कंटाळतात, ज्यामुळं त्यांना शारीरिक क्रियांद्वारे वेळ घालवावी लागते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
सतत विचार करणाऱ्या लोकांना संशोधकांनी सल्ला देखील दिला आहे. शारीरिकदृष्ट्या क्रियाशील नसणं हे आयक्यू लेव्हल चांगली असण्याचे संकेत असतात. मात्र यामुळे शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement