एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
![तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय? How To Prevent Obesity In Childrens Latest Updates तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/11123430/obesity-61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. त्यामुळेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि मोबाईलचा उपयोग ही लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत.
लठ्ठपणा टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :
- मुलं लठ्ठ होत असतील, तर त्यांना सतत रागावू नका किंवा टोमणे मारु नका. त्यामुळे लहान मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो.
- मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यसाठी पालकांनीच स्वतः पोषक आहार घ्यावा, ज्यामुळे मुलंही पालकांनी घेतलेलाच आहार घेतील.
- कोणत्याही बाबतीत तुमच्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करु नका. अभ्यास, राहणीमान किंवा लठ्ठपणा, अशा कोणत्याही बाबतीत इतरांच्या मुलांशी तुमच्या मुलांची तुलना करु नका.
- मुलं सध्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि कंप्युटर यामुळे घरातच मग्न असतात. त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावा.
- मुलांचा एक डाएट प्लॅन तयार करा. त्यानुसारच पोषक आहार मुलांना द्या.
- मुलांना पिझ्झा-बर्गर यांसारख्या फास्ट फूडची सवय असते. त्यामुळे मुलांना शक्य होईल तेवढे घरचेचं खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)