एक्स्प्लोर
Advertisement
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला अनेकदा राग अनावर होतो. याच रागामुळे बरचंस नुकसानही होतं. पण यावर देखील योगमध्ये उपाय आहे. योगच्या माध्यमातून आपल्याला रागावर नियंत्रण मिळवता येतं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आचार्य प्रतिष्ठा यांनी काही खास योगासनं सांगितली आहेत.
राग नियंत्रित करण्यासाठी गोमुखासन:
हे आसान करण्यासाठी पाय समोर आणा. त्यानंतर दोन्ही पाय एकमेकांवर आणून अशा पद्धतीनं बसा.
त्यानंतर दोन्ही हात मागे नेऊन त्यांना दोन्ही हात एकमेकांशी जुळवा.
त्यानंतर डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या आणि सो़डून द्या.
या आसनानं तुमचं चित्त स्थिर होईल.
या आसनामुळे तुमचे मन एकदम शांत होईल.
ही प्रकिया पाच वेळा करा.
दुसरी क्रिया : अट्टाहास आसन
या क्रियेमध्ये हात वर नेऊन मुक्तहास्य करावं.
या क्रियेत मनापासून हसावं. असं आपण दिवसातून तीनदा केल्यास तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.
अब्डोमिनल ब्रीदिंग:
या क्रियेत एक हात पोटावर तर दुसरा हात छातीवर ठेवा. त्यानंतर श्वास घेऊन पोट फुगवा आणि श्वास सोडताना पोट आत घ्या. ही क्रिया पाच ते दहा वेळा करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement