Mosquito : डासांना मारणाऱ्या मॉस्किटो किलर केमिकलमध्ये नेमके काय असते? 'या' लिक्विडचा केला जातो वापर
Mosquito Killing Liquid : डासांमुळे आपल्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. डासांना दूर करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स हे सर्वात किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
Mosquito Killing Liquid : हिवाळ्यात (Winter Season) डासांच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसते. आणि त्यामुळे घरात येणाऱ्या या डासांमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारखे अनेक आजारही पसरतात. आणि त्यामुळेच त्यांना मारणारी उत्पादनं जवळ ठेवणे गरजेचे आहे. बहुतेक घरांमध्ये आपल्याला डासांना मारणारी लिक्वीड दिसतात. याशिवाय डासांपासून दूर राहण्यासाठी कॉइल, स्प्रे, क्रिम्स आणि लिक्विड्स यांसारखी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मॉस्किटो रिपेलेंट इलेक्ट्रिक मशीन आजकाल खूप लोकप्रिय आहे. त्याला एक रिफिल जोडलेले आहे. ज्यामध्ये डास मारणारे द्रव भरलेले असते. हे लिक्विड नेमके काय असते? तसेच हे कशापासून बनवले जाते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
95% रॉकेलचा वापर
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही घरातील डास दूर करण्यासाठी वापरत असलेल्या इलेक्ट्रिक मशीनच्या रिफिलमधील लिक्विड रॉकेलचे प्रमाण 96.4% आहे. मात्र, रॉकेलच्या मानाने हे लिक्विड इतके महाग कसे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या लिक्विडमध्ये रॉकेल व्यतिरिक्त इतर रसायनांचादेखील वापर केला जातो. मात्र, त्यांचे प्रमाण तुलनेने कमी असते.
कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो?
डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या घातक आजारांची निर्मिती डासांपासून होते. डासांमुळे आपल्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. डासांना दूर करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स हे सर्वात किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
डासांना मारणाऱ्या लिक्विडमध्ये हे पदार्थ प्रामुख्याने वापरतात
- या लिक्विडमध्ये सुगंधी केरोसीन जास्तीत जास्त प्रमाणात असते. हे संपूर्ण लिक्विडच्या व्हॉल्यूमच्या सुमारे 96.4% आहे.
- रॉकेलनंतर त्यात ट्रान्सफ्लुथ्रीन नावाचे कीटकनाशक असते. जे या लिक्विडच्या सुमारे 1.6% आहे.
- याशिवाय, त्यात ब्युटीरेट हायड्रॉक्सीलोलिन देखील आहे, ज्याचे प्रमाण 1.0% आहे.
- बेंझिल एसिटल, सिट्रोनेलॉल आणि डायमिथाइल ऑक्टॅडिलीन यांसारख्या लिक्विडचा वापर केला जातो. यांचे प्रमाण 1.0% आहे.
- ही सर्व रसायने एकत्र मिसळून सुगंधित केरोसीनमध्ये विरघळली जातात. जेणेकरून गरम केल्यावर त्यांची सहज वाफ होऊ शकते. मशिनला इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये जोडून ते चालू केल्यावर, लिक्विडमध्ये पडलेला रॉड गरम होतो आणि त्याची हळूहळू वाफ होते. त्यानंतर तो संपूर्ण खोलीत पसरतो आणि डास मारतो.