Diabetes: जागतिक मधुमेह दिनानिमित्त 'डायबेटिस पर चर्चा', मधुमेहासंबंधी सर्व माहिती देणारा विशेष कार्यक्रम सोमवारी 'एबीपी माझा'वर
World Diabetes Day 2022 : सोमवारी, 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता 'एबीपी माझा'वर मधुमेहासंबधी प्राथमिक माहिती, त्यावरील उपचार आणि नियंत्रण यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे.
मुंबई: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार जडतात. त्यामध्ये मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत चाललं आहे. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन या संस्थेच्या सन 2021 च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक सात मधुमेही रुग्णांपैकी एक रुग्ण हा भारतीय आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत असलेला ताणतणाव यामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढताना दिसतोय.
बदलती जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे कमी वयातील व्यक्तींना मधुमेहाचा आजार जडत असल्याचं दिसून येतंय. एकाच जागेवर बसून काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याच बरोबर अनुवंशिकता हेदेखील मधुमेहामागचे एक मूळ कारण आहे.
मधुमेह म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? तसेच त्यावर उपचार कसे करायचे याबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत. जर तुम्हाला मधुमेह असेल तर 14 नोव्हेंबर 22 रोजी एबीपी माझा वर 'डायबेटिस पर चर्चा' हा कार्यक्रम पाहायला चुकवू नका.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त भारतातील सुप्रसिद्ध एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉ. उदय फडके, डॉ. मोहन मगदूम, डॉ. वर्षा जगताप आणि डॉ. अनु गायकवाड 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता 'एबीपी माझा'वर मधुमेहासंबधी प्राथमिक माहिती, त्यावरील उपचार आणि नियंत्रण याविषयी मौल्यवान माहिती देतील.
मधुमेह हा एक सायलेंट किलर आजार असून बैठी जीवनशैली आणि रोजच्या जीवनातील ताणतणाव यामुळे त्याचा धोका वेगाने वाढत आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीत काही बदलांसह डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेतल्यास मधुमेह सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.
भारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात. म्हणून 'डायबेटिस पर चर्चा' सारखे उपक्रम भारतीय जनतेमध्ये जागरुकता निर्माण करु शकतील. अनियंत्रित साखरेच्या प्रमाणामुळे शरीरातील डोळे, नस, हृदय आणि यासारख्या इतर महत्त्वाच्या अवयवांना काय नुकसान पोहोचू शकते, किडनीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल जनतेमध्ये जागरुकता निर्माण होऊ शकेल.
'डायबेटिस पर चर्चा' हा भारतातील मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रख्यात एन्डोक्रायनोलॉजिस्ट (मधुमेह विशेषज्ञ) यांनी सुरु केलेला उपक्रम आहे.
प्रत्येक भारतीयाला त्यांच्या प्रादेशिक भाषेत मधुमेह तज्ञांकडून योग्य तो सल्ला मिळावा यासाठी 'डायबेटिस पर चर्चा' हा कार्यक्रम आता प्रादेशिक टीव्हीवर प्रसारित केला जात आहे.
जागतिक मधुमेह दिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर 2022 म्हणजेच सोमवारी, पहायला विसरू नका 'डायबेटिस पर चर्चा' एबीपी माझावर दुपारी 3.30 वाजता मराठीत, ज्यात भारतातील सुप्रसिद्ध एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉ. उदय फडके, डॉ. मोहन मगदूम, डॉ. वर्षा जगताप आणि डॉ. अनु गायकवाड मधुमेहासंबधी प्राथमिक माहिती, त्यावरील उपचार आणि नियंत्रण याविषयी मौल्यवान माहिती शेअर करतील. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तीला मधुमेह आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांपासून दूर राहता येईल.
प्रक्षेपण तारीख: 14 नोव्हेंबर'22
वेळ : दुपारी 3.30 वा
चॅनल: टाटास्काय:1255, व्हिडीओकॉन D2h:762, एअरटेल DTH:534, हातवे:528
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )