World Asthama Day : दम्याची लक्षणं आहेत ? चिंता करू नका, 'या' फळभाज्यांचा आहारात समावेश करा
World Asthama Day : दमा हा देशभरात सामान्य आजार झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्ग त्याला बळी पडत आहे.
World Asthama Day 2022 : दमा हा देशभरात सामान्य आजार झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्ग त्याला बळी पडत आहे. यामुळे त्रस्त लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यामुळे खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. वैद्यकीय उपचारादरम्यान इनहेलरचा वापर केला जातो. तथापि, अशी अनेक फळे आणि भाज्या देखील आहेत ज्या आपल्याला दम्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. शिमला मिरची आणि संत्र्यापासून ते एवोकॅडोपर्यंत, दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे फळे आणि भाज्या आहेत. चला तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
शिमला मिरची :
शिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
डाळिंब :
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे सेलचे नुकसान टाळण्यास मदत करते. त्यामुळे डाळिंबदेखील खूप फायदेशीर आहे.
आले :
आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे तणाव टाळण्यासाठी आणि शरीराच्या डीएनएला होणारे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तदाब, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे आजार अशा अनेक आजारांशी लढण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
पालक :
पालक या सुपर फूडमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-के, फायबर, फॉस्फरस, थायामिन आणि व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक असतात. त्वचा, केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. दम्याची लक्षणे कमी करण्यात देखील हे तुम्हाला मदत करते.
टोमॅटोचा रस :
यामध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. लाइकोपीन सारख्या अँटिऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत असल्याने, ते हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.
सफरचंद :
यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे वजन कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. सफरचंद मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करतात.
हिरव्या शेंगा :
हिरव्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए-सी-के, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हिरव्या शेंगामध्ये असलेले व्हिटॅमिन-बी तुम्हाला नैराश्य कमी करण्यास मदत करू शकते.
एवोकॅडो :
एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर, मॅग्नेशियम, बी-6, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फोलेट भरपूर असतात. त्यामुळे श्वसनाचे आजार टाळण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार
- Health Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )