Weight Loss: ना कुठलं औषध, ना कुठलीही सर्जरी..राम कपूरने तब्बल 55 किलो वजन केलं कमी? वेट लॉस जर्नी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणादायी
Weight Loss: टीव्ही अभिनेता राम कपूरने अचानक वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याची वेट लॉस जर्नी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतेय.
Ram Kapoor Weight Loss: आजच्या काळात वजन वाढवणे जितके सोपे झाले आहे, तितकंच वजन कमी करणे कठीण होऊन बसलंय. आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन अशा गोष्टींमुळे अनेकांना लठ्ठपणाने ग्रासले आहे. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतानाही दिसतात, मात्र काही लोकांचं वजन कमी होत नाही, यामुळे ते नैराश्याचेही बळी ठरतात. अशात टीव्ही अभिनेता राम कपूरने अचानक वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने 18 महिन्यांत 55 किलो वजन कमी केले आहे. त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास कोणत्याही औषधाशिवाय किंवा शस्त्रक्रियेशिवाय असल्याचे सांगण्यात येतंय. त्याच्या वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. जाणून घेऊया..
राम कपूरच्या वेट लॉसची चर्चा..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राम कपूर सध्या सोशल मीडियावर त्याच्या वेट लॉससाठी चर्चेत आहे. त्याने 18 महिन्यांत 55 किलो वजन कमी केले आहे, जे खरंच आश्चर्यकारक आहे. त्याने वजन कमी करण्याबाबत काही खुलासे केले आहेत, ज्यामध्ये त्याने कोणत्याही गोळ्यांशिवाय आणि शस्त्रक्रियेशिवाय वजन कसे कमी केले हे सांगितले. राम कपूरने आपली जीवनशैली बदलली असून वजन कमी करण्यासाठी जुन्या पद्धतींचा अवलंब केला आहे. अभिनेत्याने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की व्यायाम आणि संतुलित आहार त्याचे वजन कमी करण्याचा आधार कसा बनला? हे सांगितले आहे
View this post on Instagram
राम कपूरने वजन कसे कमी केले?
या अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले की, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा किंवा नका, मी जुन्या पद्धतीने वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी त्याने प्रथम आपली मानसिकता बदलली आहे, कारण वजन कमी करणे हा देखील एक संकल्प आहे, ज्यामुळे दृष्टीकोन बदलतो. याशिवाय, 51 वर्षीय अभिनेत्याने सांगितले की, त्याने केवळ जीवनशैली आणि रोजच्या सवयी बदलून वजन कमी केले आहे. तसेच, अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्याच्यासाठी तो शरीराचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्ण रिसेट होता, तंदुरुस्तीचा अर्थ तराजूवर आकडे मोजणे असा नाही, तो मजबूत, उत्साही आणि निरोगी वाटण्यासाठी वजन कमी करत होता. असं राम कपूर म्हणाला.
तज्ज्ञ काय म्हणतात?
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, वजन कमी करणे कठीण काम आहे. परंतु त्यासाठी आहार आणि आरोग्यदायी सवयींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. काही लोकांना औषध किंवा शस्त्रक्रिया करावी लागू शकते, ते शरीराच्या प्रकारावर देखील अवलंबून असते. वजन कायमस्वरूपी कमी करायचे असेल तर व्यायाम, आहार आणि दैनंदिन दिनचर्या योग्य असणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. याशिवाय झोपेचीही वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असते. यूके नॅशनल हेल्थ आणि मेयो क्लिनिकच्या मते, वजन कमी करण्यासाठी काही प्रमुख घटकांची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये या 5 गोष्टींचा समावेश आहे.
सक्रिय राहा- वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरीर सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या शरीराची हालचाल होत नसेल तर वजन कमी करणे कठीण होते.
अधिक फळे आणि भाज्या खा - वजन कमी करण्यासाठी, दररोज आपल्या आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करा.
पॅकेटवरील लेबल वाचा - जेव्हा आपण कोणतेही पॅकेज केलेले उत्पादन घेतो तेव्हा फक्त तेच पदार्थ निवडा ज्यांचे पौष्टिक मूल्य लेबलवर अधिक लिहिलेले असेल.
पाणी सर्वात महत्वाचे- वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. आपल्या आहारात पाण्यासोबतच इतर द्रव पदार्थांचाही समावेश करा.
साखर आणि फॅट्सचे सेवन कमी करा - साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा, त्याऐवजी संपूर्ण धान्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
हेही वाचा>>>
Health: आयुष्यभर भयंकर आजारांपासून राहाल दूर? नवीन वर्षात स्वामी रामदेवांचा हा 2 मिनिटांचा फॉर्म्युला, एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )