Top 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP Majha
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरद पवार, भुजबळ आज एकाच मंचावर येणार, पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन,
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती.
आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट, पिंपरीत भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही दिला स्वबळाचा नारा.
लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती, शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. ज्यांच्याकडे चार चाकी आहे त्यांचीच स्क्रुटिनी होईल. परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल. आदिती तटकरे यांची माहिती
राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय. यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार.