Health: आयुष्यभर भयंकर आजारांपासून राहाल दूर? नवीन वर्षात स्वामी रामदेवांचा हा 2 मिनिट फॉर्म्युला, एकदा पाहाच..
Health: भयंकर आजारांपासून दूर राहण्यासाठी तसेच 100 वर्षे रोगमुक्त राहण्यासाठी स्वामी रामदेव यांचे खास उपाय सांगत आहोत, ज्यानंतर तुम्ही निरोगी राहाल..
Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, जंकफूडचे सेवन यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. अशात आता नवीन वर्ष 2025 सुरू झाले आहे, हे वर्ष सर्वांना आरोग्यदायी जाण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच 2 आरोग्यदायी सवयी लागू केल्या पाहिजेत जेणेकरून आयुष्यभर निरोगी आणि रोगमुक्त राहू शकता. थंडीच्या दिवसात स्वामी रामदेवजींनी प्रत्येकाला दोन सवयी स्वत:ला लावून घेण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही कामांबद्दल जाणून घेऊया. स्वामी रामदेव हे देशातील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक सल्लागार आणि योगगुरू आहेत, जे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोग्याशी संबंधित टिप्स आणि युक्त्या शेअर करत असतात. जाणून घेऊया स्वामी रामदेवांच्या हेल्दी टिप्स..
स्वामी रामदेवांनी सांगितलेली 2 कार्ये कोणती आहेत?
स्वामी रामदेव म्हणतात, आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला हेल्दी फूड खाण्यासोबतच चांगल्या सवयी पाळाव्या लागतील. 100 वर्षे रोगमुक्त राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगत आहोत, ज्यानंतर तुम्ही निरोगी राहू शकता. स्वामी रामदेव यांनी सांगितलेली ही दोन कार्ये आहेत, जलनेती आणि घृतपण. रामदेव म्हणतात की जे रोज सकाळी उठून जलनेती आणि घृतपान करतात ते 100 वर्षे रोगमुक्त आणि निरोगी राहतात. काय आहे याचा अर्थ? जाणून घेऊया..
View this post on Instagram
या कामांचे फायदे
स्वामी रामदेव म्हणतात की, या दोन्ही गोष्टी रोज करणाऱ्याला कधीच मानसिक आजार होत नाहीत. एक्जिमासारखा त्वचारोग होत नाही. या 2 गोष्टी केल्याने घशाचा त्रासही दूर होतो. या दोन्ही गोष्टींमुे पार्किन्सन्स हा मेंदूशी संबंधित गंभीर आजारही दूर राहतो.
जलनेतीचे फायदे
स्वामी रामदेव म्हणतात, यामध्ये एका बाजूने नाकातून पाणी काढून दुसऱ्या बाजूने बाहेर काढावे लागते. यामुळे नाक साफ होते. सायनस, सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या समस्यांपासूनही हे तुमचे संरक्षण करते. श्वसनाच्या समस्यांवर मात करण्यासाठीही जलनेती केल्याने फायदा होतो. जलनेती केल्याने तणावही कमी होतो.
घृतपानाचे फायदे
घृतपान म्हणजे 1 चमचा शुद्ध देशी तूप रिकाम्या पोटी खाणे. रामदेव सांगतात की रोज 1 चमचा देशी तूप रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते, वजन कमी होते आणि हाडे मजबूत होतात. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने त्वचेची चमक वाढते. तूप खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हेही वाचा>>>
Cancer: काय सांगता! कर्करोग बरा झाल्यानंतरही पुन्हा सक्रिय होऊ शकतो? संशोधनात धक्कादायक बाब समोर, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )