(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Television While Eating: जेवताना टीव्ही पाहण्याची सवय ठरू शकते घातक; जाणवू शकतात या समस्या
टीव्ही (Tv) पाहताना जेवण करणाऱ्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोक वाढतो. रात्री किंवा दुपारी जेवण करताना टीव्ही पाहिल्यानं कोणत्या समस्या जाणून शकतात? याबाबत जाणून घेऊयात...
Television While Eating: काही लोक दिवसातील काही तास टीव्ही (Tv) पाहण्यात घालवतात. टीव्हीवरील मालिका, कार्यक्रम, वेगवेगळे शो लोकांना पाहायला आवडतात. जशी ओटीटीवरील (Ott) वेब सीरिज बिंच व्हॉच केली जाते तसेच टीव्ही देखील अनेक लोक बिंच व्हॉच करत असतात. अनेकांना मोबाईलमधील (Mobile) मेसेज, विविध व्हिडीओ (Video) बघत तसेच टीव्ही बघत जेवण करण्याची सवय असते. काही लोक टीव्ही समोर बसून आपला आवडता कार्यक्रम किंवा चित्रपट (Movie) बघत जेवण करतात. एका मासिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या खाण्याच्या सवयींबाबत करण्यात आलेल्या संशोधनात एक नवीन गोष्ट समोर आली आहे की, टीव्ही पाहताना जेवण करणाऱ्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोक वाढतो. रात्री किंवा दुपारी जेवण करताना टीव्ही पाहिल्यानं कोणत्या समस्या जाणून शकतात? याबाबत जाणून घेऊयात...
वाढते वजन
टीव्ही किंवा मोबाईल फोन बघत जेवण केल्यानं सर्व लक्ष स्क्रीनवर राहते, त्यामुळे आपण किती खाल्ले आहे? याकडे दुर्लक्ष होते. टीव्ही बघत जास्त खाल्यानं वजन वाढते. वजन वाढल्यामुळे तुम्हाला हृदयाच्या संबंधित समस्या, टाइप 2 मधुमेह, रक्तदाब इत्यादीसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तर कमी खाल्यानं सतत भूक लागते.
पचनक्रियेवर होऊ शकतो परिणाम
जर तुम्हाला टीव्ही बघत जेवण्याची सवय खूप दिवसांपासून असेल तर त्यामुळे पोटाशी संबंधित आजारही होऊ शकतात. जेवण करताना टीव्ही बघताना अनेक लोक अन्न पटकन खातात. अनेक लोक अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. अन्न नीट न चावले गेले नसल्याने अपचन, पोटात दुखणे आदी समस्या निर्माण होतात.
डॉक्टर सेटर कुनटसोर यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार , 'जर तुम्ही सतत टीव्ही पाहात असाल तर तुम्ही काही वेळ ब्रेक घेतला पाहिजे. तुम्ही ब्रेक घेऊन शरीराची हालचाल केली पाहिजे. स्ट्रेचिंग देखील तुम्ही केले पाहिजे. तसेच तुम्ही टीव्ही पाहताना अन-हेल्थी स्नॅक्स खाणं देखील टाळलं पाहिजे. ' काही लोक पॉपकॉर्न, चिप्स, जंक फूड खात टीव्ही बघतात. हे देखील टाळलं पाहिजे.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )