Symptoms of Cardiac Arrest: अभिनेते ऋतुराज सिंह यांचा कार्डियाक अरेस्टनं मृत्यू; पण म्हणजे काय? कोणती लक्षणं दिसतात?
Symptoms of Cardiac Arrest: प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचा कार्डियाक अरेस्टनं मृत्यू झाला. पण कार्डियाक अरेस्ट म्हणजे, नेमकं काय? अनेकांना कार्डियाक अरेस्ट म्हणजे, हार्ट अटॅक असं वाटतं. पण कार्डियाक अरेस्ट म्हणजे, हार्ट अटॅक नाही, मग कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमकं काय?
TV Actor Rituraj Singh Dies of Cardiac Arrest : टीव्ही आणि बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचा कार्डियाक अरेस्टनं (Cardiac Arrest) मृत्यू झाला. त्यांचे निकटवर्तीय अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेते ऋतुराज सिंह यांनी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अनेक भूमिकांनी आपल्या चाहत्यांना प्रभावित केलं आहे. अवघ्या 59 वर्षांच्या या अभिनेत्याला गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजारानं ग्रासलं होतं. ऋतुराज सिंह यांच्या निधनानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. 'अनुपमा' (Anupmaa) मालिकेत त्यांनी काम केलं होतं. 90 च्या दशकात झी टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते. वर्ष 1993 मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात'ही खूप गाजला. 'हिटलर दीदी', 'ज्योती', 'शपथ', 'अदालत', 'आहट', 'दीया और बाती', वॉरियर हाय', 'लाडो 2' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचा कार्डियाक अरेस्टनं मृत्यू झाला. पण कार्डियक अरेस्ट म्हणजे, नेमकं काय? अनेकांना कार्डियाक अरेस्ट म्हणजे, हार्ट अटॅक असं वाटतं. पण कार्डियाक अरेस्ट म्हणजे, हार्ट अटॅक नाही, मग कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात सविस्तर...
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियाक अरेस्ट ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाच्या अनियमित ठोक्यामुळे हृदयाच्या सर्व क्रिया अचानक बंद होतात, ज्यामुळे श्वासोच्छवास थांबतो. हृदयविकाराचं मुख्य कारण म्हणजे, ऍट्रियल फायब्रिलेशन (Atrial Fibrillation). या स्थितीत, हार्ट वेंट्रिकल्समधील (Heart Ventricles) हृदयाचे ठोके जलद होतात, ज्यामुळे हृदय सामान्यपणे ब्लड पंप करण्याऐवजी थरथरायला लागतं. ही परिस्थिती जास्त गंभीर आहे.
कार्डियाक अरेस्टची लक्षणं काय?
कार्डियाक अरेस्टमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. याची लक्षणं शरीरात काही आठवड्यांपासूनच दिसू लागतात, पण ती फार सामान्य असतात, पटकन लक्षात येत नाहीत.
- श्वास घेण्यास त्रास (ऑर्थोपेनिया)
- रात्री झोपताना अचानक श्वास घेण्यास त्रास होणं
- सतत झोप मोड होणं
- हृदयाची धडधड वाढणं
- वारंवार खोकला येणं आणि छातीत घरघर होणं
कार्डियाक अरेस्ट ही अत्यंत गंभीर स्थिती असू शकते. अशा परिस्थितीत, आपल्याला त्याच्या लक्षणांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंगावर काढू नका.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )