तुमच्या लहान मुलांच्या चांगल्या आणि शांत झोपेसाठी 'या' आहेत खास टिप्स
हिवाळ्यात तापमानात अचानक घट झाल्याने उष्णतेपासून आराम मिळतोच पण मुलांमध्ये झोपेच्या समस्याही वाढतात.
हिवाळ्यात तापमानात अचानक घट झाल्याने उष्णतेपासून आराम मिळतोच पण मुलांमध्ये झोपेच्या समस्याही वाढतात. हिवाळ्यातील थंडी आणि सूर्यप्रकाशाची कमतरता हे शरीराच्या सर्कॅडियन लयीमध्ये अडथळा निर्माण करतात जी अनेक शारीरिक कार्ये नियंत्रित ठेवतात. थंड तापमान आणि कोरडी हवा श्वसनाच्या कार्यावर परिणाम करते विशेषत: रात्रीच्या वेळी ही समस्या उद्भवल्याने झोपेत अस्वस्थता आणि अडथळा निर्माण होतो. बऱ्याच मुलांना हिवाळ्यात रात्रीच्या वेळी पुरेसा उबदारपणा मिळविण्यासाठी मुलांना संघर्ष करावा लागतो. हवामानाशी संबंधित कोरड्या त्वचेच्या समस्यांमुळे खाज सुटणे, चिडचिड होणे आणि त्वचेला सूज येणे अशा समस्या आढळून येतात ज्याला हिवाळ्यातील त्वचारोग देखील म्हणतात.
पालकांनो या थंडीत रात्रीच्या वेळी तुमच्या मुलांच्या चांगली आणि शांत
- चांगल्या झोपेसाठी पोषक वातावरण तयार करा. झोपण्यापुर्वी किमान 1.5 ते 2 तास आधी सर्व स्क्रीन बंद करा.
- मुलांसाठी आरामदायक असे झोपेचे वातावरण सुनिश्चित करा. ब्लँकेट/रजाईसह योग्य असा उबदार पलंग निवडा.
- गरज भासल्यास बाळाच्या खोलीत ह्युमिडिफायर लावा.
- झोपेची दिनचर्या तयार करा आणि आठवडाभर त्याचे न चूकता पालन करा.
- अंधार राखण्यासाठी ब्लॅकआउट पडद्यांची निवड करु शकता.
- बाळ मोठ झाले आणि कळत्या वयात असल्यास त्यांना गोष्टी ऐकण्याची सवय लावा. झोपताना दररोज गोष्टींचे वाचन करण्याची सवय लावा.
- रात्रीच्या वेळी ते वारंवार जागे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी बाळाला पुरेसे हायड्रेटेड राखा.
- रात्री झोपण्यासाठी बाळाला झोपण्यापूर्वी बाळाला स्पंज बाथ घालण्याचा प्रयत्न करा.
- कोरड्या त्वचेला खाज सुटू नये म्हणून मॉइश्चरायझर वापरून त्वचा हायड्रेटेड राखा. जेणे करुन त्यांना खाज येऊन झोपमोड होणार नाही.
- लहान मुलांना टोपी, हातमोज आणि सॉक्सचा वापर करा जेणेकरुन त्यांना आवश्यक उबदारपणा मिळेल.
- हिवाळ्याच्या महिन्यांत रात्री नाक बंद होत असल्यास, झोपेच्या वेळी स्टीम इनहेलेशनसह डोके थोडी उंचावलेल्या स्थितीत नाकावाटे वापरल्या जाणाऱ्या स्प्रे द्या.
या व्यतिरिक्त काही समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास संकोच बाळगू नका.
- डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ,अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रेन, पुणे
इतर महत्त्वाच्या बातम्या
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )