Herbal Tea : सावधान! हर्बल टी पिताय? होऊ शकतं नुकसान, वाचा सविस्तर
Health Tips : हर्बल टी आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण याचं योग्य प्रमाणात सेवन न केल्यास नुकसान होऊ शकतं. याबाबत जाणून घ्या.
Herbal Tea Effects : चहा (Tea), कॉफी (Coffee) यांसारखे पेय आरोग्यासाठी हानिकारक असतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. दुधाचा चहा आणि कॉफी आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक तज्ज्ञ आणि डॉक्टर हर्बल चहा पिण्याचा सल्ला देतात. हर्बल चहा प्यायल्याने आपले शरीर निरोगी राहते. पण तुम्हाला माहीत आहे का की, हर्बल चहाचे प्रमाण जास्त आरोग्यासाठीही हानिकारक आहे. होय, जर तुम्ही हर्बल टी जास्त प्रमाणात प्यायले तर त्यामुळे पोटदुखी, पचनक्रिये संदर्भातील आजार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात हर्बल चहा पिणं टाळा. हर्बल चहा पिताना तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. योग्य प्रकारे हर्बल चहाचं सेवन न केल्याने किंवा अतिप्रमाणात हर्बल चहाचं सेलव केल्याने शरीराला कोणतं नुकसान होईल जाणून घ्या.
हर्बल टीचे दुष्परिणाम (Herbal Tea Side Effects)
छातीत जळजळ
हर्बल चहाचे अति प्रमाणात सेवन केल्यानं छातीत जळजळ होऊ शकते. हर्बल चहामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
पचनावर वाईट परिणाम
जर तुमची पचनक्रिया खूप खराब असेल तर हर्बल चहा पिणं टाळा. खास करून पेपरमिंट चहा टाळा, यामुळे पचनक्रियेचा त्रास वाढवतो. हर्बल टी जास्त प्रमाणात प्यायल्याने पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो, कारण पुदिन्यामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे पोटाच्या समस्या वाढतात.
गरोदरपणात नुकसान होऊ शकतं
गर्भवती महिलांनी हर्बल चहाचं जास्त प्रमाणात सेवन करू नये. जेव्हा तुम्ही गरोदरपणात हर्बल टी जास्त प्रमाणात पितात, तेव्हा ते गर्भाशयातील रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढवतो, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हर्बल चहा प्या.
मूत्रपिंडाच्या आजारांचा त्रास वाढेल
तुम्हाला मूत्रपिंडासंदर्भातील आजार असल्यास हर्बल चहा पिणं टाळा. हर्बल टी जास्त प्रमाणात प्यायल्यानं किडनी खराब होऊ शकते. तुम्हाला किडनीशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Unhealthy Diet : सॉफ्ट ड्रिंक पिताय? तर सावधान! तुमचं वय होईल 12.4 मिनिटं कमी, कसं ते वाचा
- Strong Hair : केसांना मुळापासून मजबूत बनवा, 'या' टिप्स वापरा
- Heart Health : कोविड संसर्गामुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, काय आहे यामागची कारणं?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )