Strong Hair : केसांना मुळापासून मजबूत बनवा, 'या' टिप्स वापरा
Hair Care Tips : केसांना अधिक मजबूत करायचं असेल, तर हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा. यामुळे तुमचे केस मुळांपासून मजबूत आणि सुंदर बनतील.
Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. कधी माती-धूळ, कधी ऊन तर कधी दमट हवामांन यांच्या केसांवरही परिणाम होतो. अपुरं पोषण, केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टस यांमुळेही केसांचं आरोग्य बिघडतं. पण तुम्ही घरगुती उपायांनी या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ते सविस्तरपणे जाणून घ्या.
मेथी ठरेल फायदेशीर
मेथी केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मेथीचा वापर केल्यास तुमची केस गळतीपासून सुटका होईल. मेथीमधील लोह, निकोटीन आणि प्रोटीन्समुळे केसांना पोषण मिळेल. यामुळे केस तुटणं कमी होऊन केस मजबूत होतील.
कॅस्टर ऑईलचा वापर करा
कॅस्टर ऑईल अर्थात एरंडेल तेल केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. केसांना नैसर्गिकरित्या मजबूत ठेवण्यासाठी एरंडेल तेलाचा नियमित वापर करा. कॅस्टर ऑईलमध्ये असलेल्या ओमेगा फॅटी ऍसिडमुळे केसांसंबंधित समस्या दूर होतात आणि केस मजबूत होतात.
कांद्याचा रसही फायदेशीर
केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कांद्याचा रस वापरा. कांद्याच्या रसामध्ये असलेले अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केसांच्या मुळांना मजबूत करतात. याशिवाय कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना मुळापासून मजबूत बनवते.
अंड्याचा वापर करा
केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अंड्याचा वापरा. अंड्यातील प्रथिने, जीवनसत्त्वं आणि खनिजं केस तुटण्याची समस्या दूर करतात. अंडी तुमच्या केसांना आतून कंडिशनिंग करत मुलायम आणि चमकदार बनवते.
एलोवेरा जेल
कोरफड केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा तरी केसांना एलोवेरा लावा. केसांना कंडिशनिंग करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे हेअर मास्क लावायला वेळ नसेल तर तुम्ही एलोवेरा जेलमध्ये एरंडेल तेल मिसळून केसांना लावू शकता. हे मिश्रण केसांवर रात्रभर राहू द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर संबंधित बातम्या
- Curly Hair Mask : कुरळ्या केसांना मुलायम बनवा, 'हे' हेअर मास्क वापरून पाहा
- Hair Care : पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, 'या' सोप्या टिप्स लक्षात ठेवा
- Health Tips : कोरोनाचे बळी ठरलेल्या काही लोकांमध्ये स्मरणशक्तीशी संबंधित जाणवतायत 'या' समस्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )