Monsoon Tips : पावसाळा सुरु झालाय, 'या' टिप्स नक्की वापरा
Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारही झपाट्याने पसरतात. पावसाळ्यात तुम्ही काही टिप्स वापरल्या पाहिजेत. यामुळे तुमचं दैनंदिन जीवन सोपं होईल.
Do And Don'ts In Rainy Season : पावसाळा (Monsoon) सुरु झाला की वातावरण अतिशय आल्हाददायक असते. आजूबाजूला हिरवळ पाहून मन प्रसन्न होतं. निसर्गातील हिरवळ पाहून मन फारच प्रसन्न होतं. रिमझिम पावसात भिजण्याचा मोह लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनाही आवरता येत नाही. पण असं केल्यानं आजारी पडण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर अनेकदा लोक आजारी पडतात.
अनेक वेळा हवामान बदलामुळेही काहींना आजारांना सामोरं जावं लागतं. इतकंच नाही तर पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने बरेच दिवस कपडे सुकत नाहीत. बुरशीची समस्या उद्भवते. यामुळे सर्दी आणि संसर्ग होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्या पावसात तुम्हाला उपयोगी पडतील. यामुळे तुमचं दैनंदिन जीवन सोपं होईल.
1. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्की लावा. पावसाळ्यातही ऊन्हाची किरणे हानिकारक असतात.
2. घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा.
3. फोन किंवा लॅपटॉप ओले होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिथिन किंवा वॉटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा.
4. पावसाळ्यात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे घालणं टाळा.
5. पावसात हलक्या कापडाची पातळ चादर आणि टॉवेल वापरा, हे कपडे लवकर सुकतात.
6. पावसात रोज कपडे धुवू नका. ज्या दिवशी ऊन जास्त असेल त्या दिवशी कपडे धुवा. कपडे उन्हात वाळवा.
7. पावसात घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या चप्पल वापरा.
8. अन्नपदार्थ हवाबंद डब्यात बंद ठेवा. लोणचे आणि मुरंबा यांचा डबा घट्ट बंद करून ठेवा. यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.
9. पावसात भिजल्यावर लवंग, काळी मिरी, आले आणि तुळस यांचा चहा किंवा काढा प्या.
10. तुमचे अंथरुण आणि पांघरून सूर्यप्रकाशात वाळत घाला. यामुळे कुबट वास येण्याचा आणि बुरशीचा त्रास दूर होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Side Effects Of Lemon : आहारात जास्त लिंबू वापरल्याने होईल नुकसान, 'हे' आहेत दुष्परिणाम
- Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )