एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु केले होते.

Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येला 35 दिवस उलटूनही अद्याप एक आरोपी फरार आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. तर मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. यामुळे मस्साजोगमधील (Massajog) दोन्ही मोबाइल टॉवरभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस् तैनात करण्यात आला होता. मात्र, धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांच्या विनंतीनंतर ते तब्बल दोन तासांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आहे. 

मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु केले होते. धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह पोलीस धनंजय देशमुख यांना करत होते. तर दुसरीकडे धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देखील पाण्याच्या टाकीवर चढली होती. तसेच मस्साजोगचे ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची विनंती 

पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, धनंजय देशमुखांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचा शिडी काढून टाकली. त्यामुळे पोलिसांवर खालीच हतबलपणे उभे राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता. पाण्याच्या टाकीखाली फायरब्रिगेडची गाडी देखील बोलावण्यात होती. तर मनोज जरांगे पाटील यांनी 4 ते 5 वेळा धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 

दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले

मनोज जरांगे पाटील आणि नवनीत कांवत यांच्या तब्बल दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली आले. धनंजय देशमुख हे खाली येताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मिठी मारत हंबरडा फोडला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले की, ज्यांनी माझ्या भावाला कटकारस्थान करून संपवले. त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

आणखी वाचा 

Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर
Bihar Election 2025 : बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, चिराग पासवानच्या पार्टीला किती जागा?
बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, भाजपला किती जागा मिळणार
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump Terrif : डोनाल्ड ट्रम्प भडकले, चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ
Sangola Ganpatrao Deshmukh: सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या घरावर दारुची बाटली फेकल्याचा आरोप
Chipi Airport : चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबारपासून सुरु होणार
OBC vs Maratha:  ‘सरकार जरांगे पाटलांपुढे झुकले’; वडेट्टीवारांची जोरदार टीका
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा, तर राज-फडणवीस एकाच मंचावर, राजकीय चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर
Bihar Election 2025 : बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, चिराग पासवानच्या पार्टीला किती जागा?
बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, भाजपला किती जागा मिळणार
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Eknath Shinde: लंडनला जमा केलं, मुंबईसाठी बाकी ठेवा, ठाकरे बंधूंची युती; संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं
लंडनला जमा केलं, मुंबईसाठी बाकी ठेवा, ठाकरे बंधूंची युती; संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं
Nobel Prize : नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Embed widget