Side Effects Of Lemon : आहारात जास्त लिंबू वापरल्याने होईल नुकसान, 'हे' आहेत दुष्परिणाम
Lemon Side Effects : लिंबाच्या अतिसेवनामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. लिंबाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या.
Lemon Side Effects : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. आम्ही तुम्हाला आरोग्याशी संबंधित एका समस्येबाबत सांगणार आहोत. या गोष्टीचा अधिक वापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हा पदार्थ म्हणजे लिंबू. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. अनेक जणांना लिंबू सलाडमध्ये, जेवणात, लिंबूपाणी आणि चाट पकोड्यांमध्ये घालून खायला आवडते. लिंबू योग्य प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु लिंबाच्या जास्त वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. याच्या अतिसेवनाने आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकता ते जाणून घ्या.
पोटदुखी
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पण याचं अतिसेवन आरोग्याला हानी पोहोचवू शकते. लिंबाच्या अतिसेवनामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच त्याचा तुमच्या पचनावरही वाईट परिणाम होतो.
डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते
जर तुम्ही आहारात लिंबाचा जास्त वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. आणि तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.
दातदुखी
लिंबू आम्लयुक्त असल्यामुळे दातांच्या समस्या होऊ शकतात. पुढे जाऊन ही समस्या आणखी वाढू शकते आणि दातांमधील इनॅमललाही नुकसान होऊ शकते. तुम्हाला दातासंबंधित समस्या असल्यास लिंबू खाणे बंद करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Covid19 Update : बदलत्या ऋतूत वाढतोय कोरोनाचा धोका! आजार टाळण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
- Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणं
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )