एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होऊनही पोलिस तपासाची माहितीच देत नसल्याचा गंभीर आरोप करताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलनामध्ये गावच्या महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. 

पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्यावर बांगड्या फेकल्या

आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला का 302 च्या कलमाखाली अटक करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला. यावेळी जमलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्यावर बांगड्या सुद्धा फेकल्या. संतप्त महिलांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. एसपींवर संताप व्यक्त करत बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न केला.

गनिमी काव्याने पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन

दरम्यान, धनंजय देशमुख यांनी गनिमी काव्याने पाण्याची टाकीवर चढत आंदोलन केले. आंदोलनाला गावकरीही उपस्थित होते. बीड पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी होते. त्यांनी दोन तासांपासून धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत टाकीवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र, धनंजय देशमुख यांनी पाण्याची टाकीवर गेल्यानंतर एक शिडी काढून ठेवल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचरण करण्यात आले.दोन तासांच्या मनोज जहांगे पाटील यांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले. 

एसपींशी बोलण्यास थेट नकार

आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. वैभवीला सुद्धा खाली उतरवण्यात आले.यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी एसपींशी बोलण्यास थेट नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना विनवणी करत आपण सोबतच आहोत दिवसभरात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी बोलणं करून घेऊ, मात्र आपण खाली उतरा असे आवाहन केले. दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Embed widget