उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Sushma Andhare on Devendra Fadnavis : उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी असल्याची घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Santosh Deshmukh Case : उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी आहेत. हेच गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. सध्या मस्साजोग मध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा. असेही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी म्हटले आहे.
महिला आंदोलकांकडून बांगड्याचा आहेर देण्याचा प्रयत्न
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावरून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई झाली नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे. यामुळे मस्साजोग गावात वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु करताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मास्स्जोगमध्ये दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना फोनवर चर्चा करत त्यांना खाली येण्याची विनंती केली आहे. तर यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी आल्याचे दिसून आले. दरम्यान यावेळी महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयित असल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त करीत त्यांना बांगड्याचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीच्या वर जाऊन बसले आहेत. पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, धनंजय देशमुखांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचा शिडी काढून टाकली. त्यामुळे पोलिसांवर खालीच हतबलपणे उभे राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. मनोज जरांगे आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढत त्यांना पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, धनंजय देशमुख मागे हटायला तयार नाहीत.
धनंजय देशमुखांच्या पाठोपाठा सरपंचांची लेकही पाण्याच्या टाकीवर
अशातच, संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीदेखील पाण्याच्या टाकीवर चढल्याने पोलिसांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी शिडी उपलब्ध नसल्याने आता पोलिसांनी अग्निशामन दलाला पाचारण केले आहे. कदाचित आता त्यांच्या शिडीचा वापर करुन पोलीस पाण्याच्या टाकीवर जाऊ शकतात.
हे ही वाचा