एक्स्प्लोर

Mental Health : तुमचा एकटेपणा नैराश्यात बदलू शकतो! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Mental Health : आज जगभरात एकाकीपणाच्या घटनांमध्ये वृद्धांपासून तरूण आणि किशोरवयीनांपर्यंत वाढ होत चालली आहे.

Mental Health : आजकाल जगभरातील लोकांमध्ये एकाकीपणाची समस्या अधिक प्रमाणात दिसून येतेय. विशेषत: वयोवृद्ध लोक त्याचे बळी ठरतायत. WHO च्या अहवालानुसार, चारपैकी एक वृद्ध व्यक्ती एकाकीपणाचा बळी ठरत आहे. यामध्ये तरूणांचाही तितकाच समावेश आहे. आजकालच्या धावपळीच्या काळात कामाचा वाढता ताण आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मागे राहण्याबद्दल असुरक्षिततेची भावना यांसारखी अनेक कारणे यामागे आहेत ज्यामुळे एकटेपणा वाढू शकतो. त्याच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊन व्यक्ती नैराश्याची शिकारही होऊ शकते.

एकाकीपणाशी झुंजत असलेल्या व्यक्तीमध्ये काही लक्षणे सामान्य आहे. जाणून घ्या एकाकीपणाची लक्षणे आणि ते टाळण्यासाठी काही उपाय.

झोपेचं पॅटर्न बदलणे 

जे लोक एकाकीपणाचा सामना करतात त्यांच्या झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतात, जसे की, रात्री नीट झोप न येणे किंवा सतत झोप येणे. तसेच, यामागे इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की पोषक तत्वांचा अभाव किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या. 

स्वतःला नेहमी कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करणे

एकटेपणाच्या समस्येमुळे, लोकांना अनेकदा शरीरात ऊर्जा कमी जाणवते आणि ते कोणत्याही कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तसेच, एकटेपणाचा सामना करणारे लोक देखील स्वतःला जास्त व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात.

लोकांपासून दूर राहणे आणि स्क्रीन टाईम वाढवणे

जे लोक एकाकीपणाने त्रस्त असतात त्यांना लोकांमध्ये अस्वस्थता जाणवू लागते आणि म्हणूनच ते इतरांशी बोलणे टाळतात. सामाजिक जीवनाऐवजी, हे लोक सोशल मीडियावर अधिक वेळ घालवू लागतात.

'ही' लक्षणे देखील दिसू शकतात

जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो, तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे.

एकटेपणापासून स्वतःचे रक्षण कसं कराल?

एकटेपणा टाळण्यासाठी, कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय, नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. तरी लक्षणे जाणवली तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेबरोबरच ऑईली स्किनचीही काळजी घ्या; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget