Winter Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेबरोबरच ऑईली स्किनचीही काळजी घ्या; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात ऑईली स्किन असणाऱ्यांनी त्वचेची अतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे.
Winter Skin Care Tips : हिवाळा (Winter Season) हळूहळू सुरु झाला आहे. त्यानुसार वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या ऋतूमध्ये केवळ कोरड्या त्वचेची (Dry Skin) काळजी घेणे आवश्यक नाही तर ऑईली स्किनसाठीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. या ऋतूत ऑईली स्किन असणाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी यासाठी काही टिप्स या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही या टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी फार उपयुक्त ठरतील. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल. हिवाळ्यात ऑईली स्किनची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
क्लिंजिंग करा
तुमची त्वचा तेलकट असल्यामुळे तुम्हाला दिवसातून किमान दोन-तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. तसेच, चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावर चांगला क्लिंजर वापरा. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाते. याबरोबरच छिद्रांमध्ये साचलेली घाणही साफ होते.
टोनर वापरा
चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावर टोनर वापरायला अजिबात विसरू नका. कारण टोनर त्वचेचे पीएच संतुलन राखते. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसते. जरी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे टोनर मिळत असतील तरी तुम्ही साध्या गुलाबजलचा देखील वापर करू शकता.
सनस्क्रीन वापरायला विसरू नका
सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो.
मॉइश्चरायझर वापरा
मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात, पण तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते.
फेस पॅक
कोरफड, चंदन आणि मुलतानी माती एकत्र करून घरीच फेसपॅक बनवा आणि हिवाळ्यात लावा. ते तुमच्या त्वचेला सखोल पोषण देण्यासही मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :