एक्स्प्लोर

Health Tips : त्वचेवरील जळलेल्या खुणा दूर करायच्या आहेत, करा 'हे' उपाय

Remedies For Burn Scars : त्वचेवरील जळलेले डाग, खुणा दिसायला खूप वाईट दिसतात. या डागांपासून सुटका होणं खूप कठीण आहे, पण काही घरगुती उपायांनी तुम्ही हे डाग थोडे हलके करू शकता. वाचा सविस्तर.

Remove Burn Marks : स्वयंपाक घरात जेवण बनवताना अनेकजण भाजतात (Burn). जेवण बनवताना अनेक वेळा काही गरम तेल, दूध सांडल्याने किंवा कोणत्याही गरम भांड्याला हात लावल्याने हात भाजतात. अशा परिस्थितीत तुम्ही बहुतेक महिलांच्या हातावर भाजलेल्या काळ्या खुणा (Burn Marks/Scars) पाहिल्या असतील. या डाग आणि खुणांमुळे तुमचं सौंदर्य कमी होतं. तर काही वेळा लहान मुलेही निष्काळजीपणामुळे भाजतात. कधी कधी फटाक्यांमुळे शरीरावर जळलेले डागही पडतात. अशा परिस्थितीत, जळलेल्या जागेवर जखम झाल्यानंतर खाज सुटते आणि चट्टे येतात. बर्न मार्क्स म्हणजेच जळलेल्या डागांपासून सुटका मिळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स उपलब्ध आहेत, परंतु त्या अधिक प्रभावी नसतात. त्यांचा विशेष परिणाम होत नाही. जर तुम्हांलाही जळलेल्या खुणांपासून सुटका मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय नक्की करा. जळलेले डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या.

जळलेल्याचे डाग दूर करण्यासाठीचे उपाय
1. जर तुमच्या त्वचेवर कुठेही जळण्याची खूण असेल तर त्या ठिकाणी रोज खोबरेल तेल लावा. यामुळे डाग हलका होऊन आराम मिळेल.
2. जळलेल्या खुणा दूर करण्यासाठी मध आणि हळदीची पेस्ट बनवा. ही पेस्ट जळलेल्या त्वचेवर दररोज लावा. यामुळे जळलेले डाग हळूहळू हलके होतील.
3. जळलेल्या खुणांवर रोज गाजराचा रस लावा. यामुळे जळलेले डाग हलके होतील.
4. जळलेल्या त्वचेवर बदामाचे तेल लावा. रोज बदामाचे तेल लावल्याने जळलेल्या जखमांचे डाग हलके होऊ लागतात.
5. त्वचेवरील जळलेल्या खुणा अंड्याच्या वापर करुन दूर होऊ शकतात. यासाठी अंड्याचा पिवळा भाग हलका तळून घ्या आणि मध मिसळलेल्या चिन्हावर लावा.
6. जळलेल्या त्वचेवर टोमॅटो आणि लिंबू लावून देखील तुम्ही डाग कमी करू शकता. टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळा आणि डाग असलेल्या भागावर वेळ लावा. दोन तासांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
7. जळलेल्या त्वचेवरही कांद्याचा रस लावल्यानेही डाग दूर होतात. कांद्याचा रसामुळेही जळलेल्या जखमांचे डाग हलके होतात.
8. जळलेल्या खुणा दूर करण्यासाठी तुम्ही लॅव्हेंडर तेलाचाही वापर करू शकता. लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब एका मऊ कपड्यात टाका आणि ते जळलेल्या डागांवर लावा. 
9. जळलेले डाग दूर करण्यासाठी तुम्ही डागांवर बटाट्याची सालं देखील चोळू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारचे डाग दूर होतील.
10. जळलेल्या डागांवर भिजवलेल्या मेथीची पेस्ट बनवून लावा. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावे आणि बारीक करून त्याची पेस्ट बनवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget