एक्स्प्लोर

एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या

एबीसी पथकाने मुंबईतील मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक केलेल्या कारवाईची राज्यभर चर्चा झाली.

पालघर : राज्यात एसीबी (ACB) पथकाडून धडक मोहिम सुरू असून आजच मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा पोलीस प्रशासनातही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून पालघर जिल्ह्यातही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अधिकाऱ्यास लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक केली. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून, 35 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. 

एबीसी पथकाने मुंबईतील मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक केलेल्या कारवाईची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर, अनेक ठिकाणी एसीबीने छापे टाकत लाचखोर अधिकारी, व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यातच, आता पालघर जिल्ह्यातही वैद्यकीय विभागात अशीच कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील गंजाड अंतर्गत उपकेंद्र आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे (वय 34) यांस 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदार (वय 40) यांचे इको वाहनाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी डॉक्टरांनी वारंवार पैशांची मागणी केली होती. अखेर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 17 मार्च 2026 रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपी डॉ. सांगळे यांना तक्रारदाराकडून 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.

बीडमधील तहसीलदार निलंबित

लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित असणार आहेत. छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. एका प्रकरणात सॉल्वन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी मुंडे यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. याच प्रकरणात व्यंकटेश मुंडे यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना अंबाजोगाईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

हेही वाचा

मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget