एक्स्प्लोर

मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात

उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर शेड्युलनुसारच होणार आहे, विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असे आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.

पुणे : राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या होणारा भूगोलाचा पेपर (Exam) दिलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यात (Sangola) दहावीच्या परीक्षेदरम्यान भूगोलाचे 50 पेपर चोरी गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. या संपूर्ण घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने मागितला होता. त्यामुळे, उद्याच्या परीक्षेवर आणि बोर्डाच्या पेपरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, उद्या 10 वी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर होणार की नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र, बोर्डाने (SSC) दहावीचा पेपर वेळापत्रकानुसार होणार असं जाहीर केलं आहे.  

उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर शेड्युलनुसारच होणार आहे, विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असे आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे. सांगोल्यातून उद्या होणाऱ्या भूगोलाच्या 50 पेपरची आज सकाळी चोरी झाली होती. त्यामुळे उद्याच्या पेपरबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. मात्र, उद्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच भूगोलाचा पेपर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे.

दरम्यान, बोर्डाने पेपर घेण्याचा निर्णय घेतल्याने दहावीच्या भूगोलाच्या पळवून नेलेल्या 50 पेपरचे झेरॉक्स, फोटो कोणी काढले असेल आणि ते जर व्हायरल केले असेल तर त्याची जबाबदारी बोर्ड स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

शिक्षणाधिकाऱ्याचे निलंबन

सांगोला येथील बोर्डाचे पेपर चोरीप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांचेवर ठपका ठेवत शिक्षण विभागाने त्यांचे तडकाफडकी निलंबित केले आहे. याशिवाय या इथे सुरक्षेवर असणारे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्याबाबतच्या अहवालानुसार त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार आहे. दरम्यान, उद्याचा बोर्डाचा भूगोलाचा पेपर ठरल्यावेळी प्रमाणेच घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शांतपणे पेपर सोडविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या बैठकीला सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, बोर्डाचे प्रतिनिधी उकिरडे, सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते

हेही वाचा

एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Baramati Crime News : विधवेचा गैरफायदा घेऊन शरीरसुखाची मागणी, बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, किशोर मसाळांवर आता पक्षाकडूनही कारवाईचा बडगा!
विधवेचा गैरफायदा घेऊन शरीरसुखाची मागणी, बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, किशोर मसाळांवर आता पक्षाकडूनही कारवाईचा बडगा!
पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget