Health Tips : कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'या' खास गोष्टींचा आहारात करा समावेश
Covid-19 : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला हवा.
Corona cases in India : कोरोनाकाळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश करायला हवा. प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे अशा गोष्टी असणाऱ्या पदार्थांचा कोरोनाकाळात आहारात समावेश करायला हवा. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर काही उपाय लक्षात ठेवले पाहिजे.
प्रोटीन आणि खनिजे
योग्य प्रमाणात प्रोटीन आणि खनिजांचा शरीराला पुरवठा झाला पाहिजे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, बीटा कॅरेटीन हे घटक असलेल्या फळभाज्या, फळांचा आपल्या आहारात समावेश करा. मशरूम, टोमॅटो, शिमला मिरची, ब्रोकलीद्वारे तुम्हाला पौष्टिक घटकांचा पुरवठा होईल.
सुकामेवा
शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काळे खजूर खाल्ल्यासही रोगप्रतिकार शक्ती वाढते. सुकामेव्यातही प्रथिने, क्षार, फॅटी अॅसिड असतात. सोबतच आहारामध्ये दही, लिंबू पाणी, लसूण चटणीचा समावेश करावा.
हळदीचे दूध
सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही नियमित हळदीच्या दुधाचेही सेवन करू शकता. शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा हळदीचे दूध प्यावे. दूध पिण्यापूर्वी तसंच प्यायल्यानंतर लगेचच अन्य पदार्थ खाऊ नका.
काढा
तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले आणि काळे मनुके एकत्र घ्या आणि त्याचा काढा तयार करा. या काढ्याची चव अतिशय तिखट वाटल्यास गूळ किंवा लिंबू रस त्यामध्ये मिक्स करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Skin Care : थंडीमध्ये मुलायम त्वचा हवीये? वापरा हे स्क्रब, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
Skin Care : पिंपल्सच्या समस्येवर गुणकारी कापूर, इतरही अनेक फायदे
Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )