(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : पाच तासांपेक्षा कमी झोप शरीरासाठी हानिकारक; गंभीर आजारांना निमंत्रण
Health Tips : रोज पाच तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
Health Tips : ऑफिसमधील काम तसेच इतर कामांमुळे अनेक लोक झोपेकडे दुर्लक्ष करतात. रोज कमी वेळ झोपल्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. अनेक वेळा लोक सुट्टीच्या दिवशी खूप वेळ झोपून राहतात, पण रोज कमी वेळ झोपतात. रोज योग्य वेळ झोपणं हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही रोज पाच तासांपेक्षा कमी वेळ झोपत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात रोज पाच तासापेक्षा कमी झोपल्यानं होणारे आजार-
मूड स्विंग्स -
जर तुम्ही सहा ते आठ तास न झोपता केवळ पाच तास झोप घेतली तर तुम्हाला मूड स्विंग्स ही समस्या जाणवू शकते. तसेच नैराश्य, अँजाइटी देखील होऊ शकते. त्यामुळे रोज सहा ते आठ तास झोपणे आवश्यक आहे.
मधुमेह -
शरीरामध्ये इन्सुलिन लेव्हल कमी झाल्यानं मधुमेह होतो. पाच तसांपेक्षा कमी वेळ झोपल्यानं शरीरातील इन्सुलिन लेव्हल कमी होते. जे लोक कमी वेळ झोपतात त्यांची ब्लड शुगर लेव्हल जास्त होते. त्यामुळे त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते.
वजन वाढणे-
कमी वेळ झोपल्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. डोक्यामध्ये काही केमिकल रिअॅक्शन्स होतात. त्यामुळे भूक जास्त लागते आणि आहार देखील वाढतो. म्हणून योग्य वेळ झोपणं आवश्यक आहे.
इम्यूनिटी कमी होणे
रोज कमी वेळ झोपल्यानं शारीराची इम्यूनिटी कमी होते. त्यामुळे सर्दी खोकला, ताप इत्यादी आजार होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : सावधान! सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी करू नका, शरीरासाठी ठरेल घातक
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )